केबीसी हा टेलिव्हिजनवरील अतिशय लोकप्रियता मिळवलेला शो. बिग बी अमिताभ बच्चन याचं सूत्रसंचालन करतात. या शोमध्ये सामान्य व्यक्तींना काही प्रश्नांची उत्तरे देऊन लाखो रुपये कमावण्याची संधी मिळते. खेळ खेळण्यासोबतच बिग बी हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकासोबत गप्पाही मारतात. केबीसीमधील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक स्पर्धक त्यांना मराठी नावाचा उच्चार शिकवत असल्याचं दिसत आहे.
कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर अंजनगाव येथील स्नेहल जावरे या सहभागी झाल्या होत्या. पण, बिग बींना त्यांच्या आडनावाचा उच्चार करता येत नव्हता. स्नेहल यांच्या आडनावातील 'ज'चा उच्चार अमिताभ बच्चन चुकीच्या पद्धतीने करत होते. स्नेहल यांनी बिग बींना 'ज'चा बरोबर उच्चार करण्यास शिकवलं. स्नेहल म्हणाल्या एक ज तालव्य आणि दुसरा दंततालव्य पद्धतीने उच्चारतात. त्यानंतर बिग बींना त्यांनी ते म्हणायला शिकवलं. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत तर स्नेहल यांनी बिग बींना च आणि ज मधला फरकही समजावून सांगितला.
दरम्यान, स्नेहल जावरेंनी प्रश्नांची अचूक उत्तरे देत २५ लाखांच्या प्रश्नांपर्यंत मजल मारली होती. १२ लाख ५० हजारांसाठी त्यांना मेजर लीग क्रिकेट २०२५ मध्ये एमआय न्यूयॉर्क टीमचा भाग असलेला, अग्नी हा कोणत्या हिंदी चित्रपट दिग्दर्शकाचा मुलगा आहे? पर्याय: A. राजीव राय B. राजकुमार संतोषी C. नितेश तिवारी D. विधु विनोद चोप्रा. उत्तर माहित नसल्याने स्पर्धकाने 'ऑडियन्स पोल' लाइफलाइनचा वापर केला. शोमधील जास्तीत जास्त प्रेक्षकांनी 'D. विधु विनोद चोप्रा' हा पर्याय निवडला. त्यामुळे प्रेक्षकांच्या मतावर विश्वास ठेवून स्पर्धकाने तेच उत्तर दिलं, जे बरोबर ठरलं. परंतु नंतर २५ लाखांच्या प्रश्नाचं उत्तर चुकल्याने स्पर्धकाला फक्त ५ लाख रुपये विजयी रक्कम मिळाली.
Web Summary : On KBC, Amitabh Bachchan struggled to pronounce a Marathi contestant's surname, 'Jaware.' The contestant taught him the correct pronunciation of 'Ja' and differentiated between similar sounds. She reached the 25 lakh question but won 5 lakh.
Web Summary : केबीसी में अमिताभ बच्चन को एक मराठी प्रतियोगी का उपनाम, 'जावरे,' बोलने में मुश्किल हुई। प्रतियोगी ने उन्हें 'ज' का सही उच्चारण सिखाया और समान ध्वनियों के बीच अंतर बताया। वह 25 लाख के प्रश्न तक पहुंची लेकिन 5 लाख जीते।