Join us

KBC: 'या' जीवाचा फोटो ओळखू शकला नाही स्पर्धक, २५ लाखांच्या प्रश्नावर क्विट केला शो....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 09:44 IST

उदय भानु यांनी असंच केलं. बराच वेळ विचार केल्यावर त्यांनी २५ लाख रूपयांच्या प्रश्नावर त्यांनी शो क्विट केला आणि १२ लाख ५० हजार रूपये घेऊन घरी गेले.

कौन बनेगा करोडपतीच्या बुधवारच्या एपिसोडमध्ये स्पर्धक उदय भानुजी हॉट सीटवर बसले होते. फारच शांतपणे त्यांनी प्रश्नांची उत्तरे देत पहिला आणि दुसरा टप्पा पार केला. यानंतर त्यांनी फार समजदारी आणि विचारपूर्वक खेळ पुढे नेला. असं करत करत ते २५ लाख रूपयांच्या प्रश्नावर पोहोचले.

मात्र, या २५ लाख रूपयांच्या प्रश्नावर पोहोचेपर्यंत उदय भानु यांच्या सर्व लाइफलाईन संपल्या होत्या. अमिताभ यांनी प्रश्न विचारताच स्पर्धकाला सूचना देण्यात आली की, जर त्यांना ठामपणे या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तरच उत्तर द्या, अन्यथा तुम्ही जिंकलेली रक्कम गमावू शकता आणि परत ३ लाख २० हजार रूपयांच्या प्रश्नावर येऊन पोहोचाल. (KBC 12: 'या' स्पर्धकाला कियारासोबत करायचंय लग्न, १ कोटीच्या प्रश्नाचं तिचा फोटो पाहून देणार उत्तर)

उदय भानु यांनी असंच केलं. बराच वेळ विचार केल्यावर त्यांनी २५ लाख रूपयांच्या प्रश्नावर त्यांनी शो क्विट केला आणि १२ लाख ५० हजार रूपये घेऊन घरी गेले. चला जाणून घेऊ त्यांना २५ लाखांसाठी कोणता प्रश्न विचारण्यात आला आणि तुम्हाला या प्रश्नाचं बरोबर उत्तर माहीत आहे का?

प्रश्न - या जीवाला ओळखा ज्याला ऑक्टोबर २००३ मध्ये केरळच्या इडुक्कीमध्ये शोधण्यात आलं होतं.

A. पॉन्ड फ्रॉग, B.पर्पल फ्रॉग, C.नॉर्थन रेनफ्रॉग, D.मालाबार ग्लाइडिंग फ्रॉग

पर्याय बी म्हणजे पर्पल फ्रॉग या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं. खेळ क्विट केल्यावर उदय भानु यांनी पर्याय सी लॉक केला होता. अशात त्यांचा शो क्विट करण्याचा निर्णय पूर्णपणे योग्य ठरला. 

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीअमिताभ बच्चनटेलिव्हिजन