Join us
Daily Top 2Weekly Top 5

​कट्टी बट्टी फेम अश्विनी कासार खऱ्या आयुष्यात आहे उच्चशिक्षित, तिच्या पदव्या ऐकून तुम्ही व्हाल चकित...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 16:24 IST

'नवे पर्व युवा सर्व' हे ब्रीद वाक्य घेऊन झी युवा या वाहिनीने नेहमीच रसिक प्रेक्षकांसाठी उत्तमोत्तम मालिका आणल्या आणि ...

'नवे पर्व युवा सर्व' हे ब्रीद वाक्य घेऊन झी युवा या वाहिनीने नेहमीच रसिक प्रेक्षकांसाठी उत्तमोत्तम मालिका आणल्या आणि प्रेक्षकांनी त्या मालिकांना मनापासून पसंतीसुद्धा दिली. या मालिकांमध्ये प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा प्रेक्षकांना अनुभवायला मिळाल्या. प्रेम ही भावनाच अशी आहे, ज्यापासून कोणीही दूर राहू शकलेला नाही. झी युवा या वाहिनीने अहमदनगरमध्ये राहणाऱ्या पूर्वा आणि पराग यांच्या मोडलेल्या लग्नाची आणि जुळलेल्या प्रेमाची गोष्ट 'कट्टी बट्टी' प्रेक्षकांच्या भेटीस आणली. प्रेक्षक सहकुटुंब ही मालिका पाहून त्यात घडणाऱ्या रोजच्या आयुष्यातील गंमतीजंमतींचा मनसोक्त आस्वाद घेत आहेत. मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे की, पूर्वा लग्ना नंतरही तिचे पीएचडीचं शिक्षण पूर्ण करण्याचे ठरवते. पडद्यावरील या व्यक्तिरेखेप्रमाणेच अश्विनीचाही खऱ्या आयुष्यात उच्च शिक्षणाकडे कल आहे. अश्विनी ही अर्थशास्त्र या विषयात पदवीधर आहे. तसेच तिने लॉमध्ये मास्टर्स केले आहे. त्यानंतर उच्च न्यायालयात तिने वकिलीची प्रॅक्टिसदेखील केली आहे. शिक्षण हे प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी सर्वात मजबूत हत्यार आहे आणि अभिनय करतानासुद्धा त्याचा महत्वाचा वाटा आहे असे अश्विनीला वाटते. पडद्यावरील जीवनात शिक्षणाला अतिशय महत्त्व देणारी पूर्वा आणि खऱ्या आयुष्यातील अश्विनी यांची शिक्षणाबद्दलची मतं सारखीच आहेत. याविषयी अश्विनी सांगते, "या क्षेत्रात येण्याआधी मी माझं शिक्षण पूर्ण केलं आणि मगच अभिनय करण्याचं ठरवलं. आम्ही काम करत असलेल्या इंडस्ट्रीचे स्वरूप अतिशय अनिश्चित आहे. येथे तुमच्या जागी दुसरे कोणीही लगेच येऊ शकते आणि अशावेळी शिक्षण तुमच्या पाठीशी उभे राहते. कधीतरी तुम्हाला अचानक जाग येते आणि तुम्ही जे काही करत असता ते तुम्हाला आवडेनासे होते तेव्हाही शिक्षणच तुम्हाला वाचवू शकते. तुमच्या शैक्षणिक कारकि‍र्दीसाठी नाही तर तुमच्या संपूर्ण विकासासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. तसेच तुम्हाला जे काही आवडते तेच करा. कारण त्यामुळे तुम्ही त्या विषयाकडे अधिक गांभीर्याने पाहाता... परिपूर्ण ज्ञान हे नेहमीच तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मदत करते."Also Read : ​कट्टी बट्टी या मालिकेद्वारे पुष्कर सरदने केली छोट्या पडद्यावर एंट्री