Join us
Daily Top 2Weekly Top 5

'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेमध्ये कश्यप नांदेची होणार एन्ट्री ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 14:49 IST

देवयानी ईतकी धूर्त आहे कि,प्रेमला ती आणि राधा कुठे आहे याचा अजिबात पत्ता लागू देत नाहीये. या सगळ्या परीस्थीतीत आणि गुंत्यामध्ये कसा प्रेम राधाचा शोध घेईल ? कधी आणि कशी राधा आणि प्रेमची भेट होईल ? हे बघणे रंजक असणार आहे.

राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये प्रेम अजूनही राधाच्या शोधात आहे. प्रेमला आता दीपिका आणि देवयानीचे कटकारस्थान कळले असून, देवयानीने राधाला कुठेतरी लपवले आहे हे देखील प्रेमला माधुरीने सांगितलेआहे. गेल्या काही भागांमध्ये मालिकेमध्ये बऱ्याच घटना घडल्या आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांना बराच ड्रामा बघायला मिळाला. माधुरीचे विक्रमला म्हणजेच तिच्या पहिल्या नवऱ्याला अचानक भेटणे असो वा माधुरीसमोर विक्रमने देवयानी आणि विश्वनाथच्या मैत्री बद्दल खुलासा करणे असो. या सगळ्या घटनांमुळे मालिकेला एक नवे वळण मिळणार आहे यात शंका नाही. राधा आणि प्रेमची अजूनही भेट झालेली नसून, माधुरी राधाच्या शोधात असतानाच तिची भेट विक्रमशी झाली जेंव्हा ती आनंद नाडकर्णी यांच्या घरी आली. याचदरम्यान माधुरी प्रेमला त्याच्या वडिलांचे सत्य सांगण्यासाठी फोन करते. माधुरी प्रेमला त्याचे वडील विक्रम हे जिवंत आहेत हे सांगते आणि त्या दोघांचे बोलणे देखील करून देते. प्रेमला हे सगळे कळल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. हे सगळे घडत असताना विक्रम आणि विश्वनाथ ची देखील भेट आनंद नाडकर्णी यांच्या घरामध्ये होते, आणि बऱ्याच वर्षांपासूनचे घट्ट मित्र पुन्हाएकदा एकमेकांना भेटतात. येत्या महारविवार मध्ये कश्यप नांदेची एन्ट्री होणार असून कोण आहे हा कश्यप नांदे ? राधा आणि कश्यपमध्ये काय संबंध आहे ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना येत्या रविवारच्या भागामध्ये मिळणार आहेत.

 

प्रेम देव्यानिकडून राधाबद्दल माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. देवयानी ईतकी धूर्त आहे कि, प्रेमला ती आणि राधा कुठे आहे याचा अजिबात पत्ता लागू देत नाहीये. या सगळ्या परीस्थीतीत आणि गुंत्यामध्ये कसा प्रेम राधाचा शोध घेईल ? कधी आणि कशी राधा आणि प्रेमची भेट होईल ? हे बघणे रंजक असणार आहे.

 

तू माझा सांगाती ही मालिका आता भक्तीच्या परमोच्च बिंदूवर येऊन ठेपली आहे. जिथे तुकोबांना लागणार आहे विठुरायाच्या दर्शनाची आस पण भक्ताची ही आस भगवंत पूर्ण करणार का ? कशी पूर्ण करणार ? हा प्रवास आता मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. येत्या रविवारीच्या भागामध्ये विठ्ठल भेटीचा मुहूर्त सुनिश्चित होणार आहे. परंतु आवलीला याची काही जाणीव नाही. तसेच आवली लवकरच गोड बातमी देणार आहे. एकीकडे अशी आनंदाची बातमी आणि दुसरीकडे विठ्ठल भेटीचा ध्यास तुकोबांच्या मनी आहे. आता तुकोबांना प्रपंचामध्ये अधिक न अडकता परमार्थचा मार्ग निवडायचा आहे.