Join us

मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 09:03 IST

कार फक्त १० इंच पुढे सरकतेय...काश्मीरा काय म्हणाली?

कॉमेडियन कृष्णा अभिषेकची (Krushna Abhishek) पत्नी अभिनेत्री कश्मीरा शाहने (Kashmera Shah) सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. स्वातंत्र्य दिनाचा हा व्हिडीओ आहे. यामध्ये ती कार तालवत असून रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे त्रासलेली आहे. मजेशीर पद्धतीने तिने यावर भाष्य केलं आहे. सोबतच निराशाही व्यक्त केली आहे. मुंबईतल्यावाहतूक कोंडीच्या समस्येवर तिने बोट ठेवलं आहे. नक्की काय म्हणजे कश्मीरा?

कश्मीरा शाहने मुंबईतील मालाड परिसरातला व्हिडीओ शेअर केला आहे.  ती या ठिकाणी वाहतूक कोंडीत अडकली आहे. ती म्हणते, 'अरे काय यार, मालाड, मालवणी, मिथ चौकी इथे वाहतूक कोंडीत मी अर्ध्या तासापासून कारमध्ये बसले आहे.  इतकं ट्रॅफिक? मालाडमध्ये इतके सगळे लोक आहेत? इतके लोक राहतात? कसे फिट होतात यार? काय आहे हे? परेशान झालीये, फक्त १० इंच गाडी पुढे जातीये."

काश्मीराने कॅप्शन देत लिहिले,"या मालाडची काय अडचण आहे? तुम्हीही अशा वाहतूक कोंडीत अडकले आहात का? एक तर इतक्या वर्षांनी मालाडमध्ये आले आणि असं स्वागत?"

काश्मीराच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही मजेशीर कमेंट केल्या आहेत. 'किती लोक राहतात मालाडमध्ये?','मुंबईतली अर्धी जनता मालाडमध्येच राहते वाटतं','लोकलमधून प्रवास करत जा'.

काश्मीरा शाह 'लाफ्टर शेफ'मध्ये दिसली होती. यामध्ये तिची आणि कृष्णाची कॉमेडी प्रेक्षकांनी खूपच एन्जॉय केली. कश्मीराला दोन मुलं आहेत. ती कायम सोशल मीडियावर विनोदी व्हिडीओ शेअर करत असते.  

टॅग्स :टिव्ही कलाकारवाहतूक कोंडीमुंबईव्हायरल व्हिडिओ