Join us
Daily Top 2Weekly Top 5

करिश्मा तन्नाने शेअर केला रेड आऊटफिटमधला फोटो, फॅन्स झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 17:42 IST

करिश्मा तन्ना नेहमीच आपल्या स्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

करिश्मा तन्ना नेहमीच आपल्या स्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर नजर टाकली तर त्याल ग्लॅमरस, बोल्ड आणि हॉट फोटोंनी धुमाकाळ घातलेला दिसतो. करिश्मा बॉलिवूडच्या अभिनेत्रींना बोल्डनेसच्या बाबती टक्कर देते. ती पुन्हा एकदा आपल्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत असते. रेड हॉट आउटफिटमध्ये करिश्माने शेअर केलेल्या फोटोला चाहत्यांनी खूप पसंत केले.

 करिश्माच्या फोटोवर एका चाहत्याने लिहिले, "लाल छडी मैदान खडी", तर एकाने मी तुझ्या फोटो वर फिदा झालो आहे. दुसर्‍या चाहत्याने 'सिझलिंग ब्युटी' अशी कमेंट केली आहे.

2000 पासून टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम करत असून करिश्मा तन्नाने आजवर 'क्योंकी साँस भी कभी बहू थी', 'कही तो मिलेंगे', 'देस में निकला होगा चाँद', 'शरारत', 'कुसूम' 'जोर का झटका', 'कॉमेडी नाइट्स विद कपिल', 'बिग बॉस 8', 'नच बलिए 7' आणि 'फियर फॅक्टर : खतरों के खिलडी' मध्येही दिसली आहे.

तिच्या आजवरच्या अनेक भूमिका प्रेक्षकांना आवडल्या आहेत. 'कयामत की रात'मधली तिची राणीची भूमिका देखील प्रेक्षकांना तितकीच आवडली होती. करिश्माने २०१३ साली ' ग्रॅंड मस्ती' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत. र रणबीर कपूरच्या 'संजू'मध्ये तिला संधी मिळाली.या सिनेमात देखील तिने केलेल्या भूमिकेचे कौतूक झाले होते.

टॅग्स :करिश्मा तन्ना