Join us  

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशनं केलं गुपचूप लग्न?, या पोस्टमुळे चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 2:06 PM

Karan Kundra And Tajaswi Prakash : करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, एक पोस्ट खूप व्हायरल होत आहे, ज्यामुळे करण-तेजस्वी आधीच विवाहित असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

करण कुंद्रा (Karan Kundra) आणि तेजस्वी प्रकाश (Tejaswi Prakash) ही टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय जोडी आहे. बिग बॉस १५च्या दरम्यान त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. शोमधून बाहेर आल्यानंतर त्यांचे नाते दिवसेंदिवस घट्ट होत गेले. चाहत्यांना ही जोडी खूप आवडते आणि दोघांनी लवकरात लवकर लग्न करावे अशी त्यांची इच्छा आहे. पण आता अफवा पसरवल्या जात आहेत की करण आणि तेजस्वीने आधीच लग्न केले आहे, 

खरेतर तेजस्वी आणि करण यांनी नुकतीच मुंबईत इस्रायलचे कौन्सुल जनरल कोबी शोशानी यांची भेट घेतली होती. यादरम्यान इस्रायली कौन्सिल जनरलने त्यांचा एकत्र एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आणि त्याच्या कॅप्शनमध्ये तेजस्वीला करणची पत्नी असे लिहिले. वास्तविक कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, करण कुंद्रा एक सुंदर अभिनेता तसेच एक सज्जन माणूस आहे. त्यांची पत्नी तेजस्वी प्रकाश यांना भेटूनही खूप आनंद झाला. या पोस्टकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आणि लोकांना असे वाटू लागले की हे जोडपे आधीच विवाहित आहे.

तेजस्वी-करणच्या फोटोवर चाहते करताहेत कमेंट पोस्टवर प्रतिक्रिया देताना करणने लिहिले की, "आम्हाला तुमच्या घरी आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला कुटुंबासारखे वाटले. ” त्याचवेळी तेजस्वी आणि करणचा इस्रायलचे कौन्सुल जनरल कोबी शोशानीसोबतचा फोटो व्हायरल होताच चाहत्यांनीही प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका चाहत्याने लिहिले, "मिसेस आणि मिस्टर करण कुंद्राला कोणाची नजर लागू नये." तर दुसर्‍याने लिहिले, "आम्हाला हे आधीच माहित होते."

टॅग्स :तेजस्वी प्रकाशकरण कुंद्रा