Join us

करण जिममध्ये घाम गाळतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 15:15 IST

ये है मोहोब्बते या मालिकेच्या टीममधील कलाकारांनी सध्या फिटनेसचा कित्ता गिरवायचा असे ठरवले आहे. करण पटेल, अली गोनी, रोहित ...

ये है मोहोब्बते या मालिकेच्या टीममधील कलाकारांनी सध्या फिटनेसचा कित्ता गिरवायचा असे ठरवले आहे. करण पटेल, अली गोनी, रोहित रेड्डी हे सगळेच सध्या अनेक तास जिममध्ये घाम गाळत आहेत. या सगळ्यांनी फिट होण्यासाठी मेहनत घेण्याचे ठरवले आहे. करणला कधीच जिममध्ये जायला आवडत नाही. पण सध्या करण रोज जिममध्ये तर जात आहे. पण त्याचसोबत तो डाएटही करत आहे. त्याच्यासोबत अली आणि रोहित एकही दिवस न चुकवता जिममध्ये जात आहेत. प्रेक्षकांनी आम्हाला कधीही न पाहिलेल्या रूपात यायचे आम्ही तिघांनी ठरवले आहे आणि त्यासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेत असल्याचे करण सांगतो.