Join us
Daily Top 2Weekly Top 5

कपिल का दिल तूट गया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 16:44 IST

द कपिल शर्मा शोमध्ये येणाऱ्या अभिनेत्रींसोबत फ्लर्ट करण्याची एकही संधी कपिल शर्मा सोडत नाही. पण सोनाक्षी सिन्हाने त्याचे हृदय ...

द कपिल शर्मा शोमध्ये येणाऱ्या अभिनेत्रींसोबत फ्लर्ट करण्याची एकही संधी कपिल शर्मा सोडत नाही. पण सोनाक्षी सिन्हाने त्याचे हृदय तोडले असल्याने तो सध्या खूपच दुःखी आहे. सोनाक्षी अकिरा या तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कार्यक्रमात आली होती. यावेळी तिने येताना राखीसोबत आणली आणि तिने ही राखी कपिलला बांधली. इतक्या सुंदर मुलीने राखी बांधल्यामुळे कपिलला खूपच वाईट वाटले. सोनाक्षीने कपिलला राखी बांधतानाचा फोटोदेखील तिने सोशल नेटवर्किंगवर शेअर केला आहे. या फोटोत कपिलचा उतरेला चेहरा पाहून तुम्हाला नक्कीच हसायला येईल.