Join us

कपिल शर्माला चॅनेल का बजावली नोटीस ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 12:58 IST

कॉमेडीयन कपिल शर्माचं सध्या काय सुरु आहे हे सध्या कुणालाच कळेनासं झालं आहे. काही ना काही वादामुळे कपिल सध्या ...

कॉमेडीयन कपिल शर्माचं सध्या काय सुरु आहे हे सध्या कुणालाच कळेनासं झालं आहे. काही ना काही वादामुळे कपिल सध्या चर्चेत आहे. जुन्या सदस्यांनी साथ सोडल्यानं द कपिल शर्मा शोचं घटणारा टीआरपीसह विविध गोष्टींमुळे सध्या कपिल या ना त्या वादात अडकल्याचं पाहायला मिळत आहे. आता असाच एक नवा वाद समोर आला आहे. बेजबाबदारपणाचा आरोप करत कॉमेडीयन कपिल शर्माला त्याचा शो ज्या चॅनलवर सुरु आहे त्या चॅनलने नोटीस बजावली आहे. गेल्या काही दिवसांपासून कपिल कायम हे ना ते कारण देऊन त्याच्या शोचं नियोजित शूटिंग रद्द करत आहे. त्यामुळे अनेक बॉलीवुडच्या सेलिब्रिटींना सेटवर येऊन माघारी फिरावं लागत आहे. कपिलच्या या वागण्यामुळे नाराज झालेल्या चॅनलने त्याला ही नोटीस बजावली आहे. गेल्या काही दिवसांपासून कपिलची तब्येत खराब असल्याचं बोललं जात आहे. कपिलच्या शोमध्ये ज्यावेळी शाहरुख खान, अनुष्का शर्मा, अनिल कपूर, अर्जुन कपूर, परेश रावल आपापल्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आले त्यावेळी बिघडलेल्या तब्येतीचा हवाला देत कपिलनं शुटिंग रद्द केलं. मात्र नुकतंच बादशाहो सिनेमाच्या टीमबाबतही असंच काहीसं घडलं. बादशाहोची टीम प्रमोशनसाठी कपिलच्या शोच्या सेटवर पोहचली. मात्र तिथं कपिल काही पोहचला नाही. प्रॉडक्शन टीमनं ब-याचदा कपिलला फोन लावून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कपिलचा फोन सतत स्वीच ऑफ येत होता. त्यामुळे बॉलीवुडचा सिंघम अजय देवगणसह. इमरान हाश्मी. इलियाना डिक्रुझ, इशा गुप्ता सेटवर येऊन माघारी परत गेले. यावेळी कपिलला पॅनिक अटॅक आल्याचं त्याच्या शोच्या टीमकडून सांगण्यात आलं. मात्र वेळेवर न उठल्याने कपिल सेटवर पोहचला नसल्याच्या चर्चा ऐकायला मिळाल्या. त्यामुळे नाराज झालेल्या चॅनेलनं आता थेट कपिलला नोटीस बजावली आहे. टीआरपीच्या रेसमध्येही कपिलचा शो डांस प्लस-3, खतरों के खिलाडी आणि सारेगामापा या शोच्या मागेच आहे.