कपिल शर्माला दुस-यांदा दिला जाणार दादासाहेब फाळके पुरस्कार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2017 12:02 IST
खरंतर कपिल शर्मासाठी हे वर्ष जरा वादग्रस्तच ठरतंय. सुनील ग्रोवरसह झालेला वादामुळे कपिलच्या चेह-यावरचे हसूच गायब झाले होते. पण ...
कपिल शर्माला दुस-यांदा दिला जाणार दादासाहेब फाळके पुरस्कार!
खरंतर कपिल शर्मासाठी हे वर्ष जरा वादग्रस्तच ठरतंय. सुनील ग्रोवरसह झालेला वादामुळे कपिलच्या चेह-यावरचे हसूच गायब झाले होते. पण आता या सगळ्या गोष्टीतून बाहेर येण्यासाठी त्याच्या चेह-यावर पुन्हा आनंद झळकू लागला आहे.त्याला कारणही तसे खासच आहे कारण आता दादासाहेब फाळके पुरस्काराने कपिलला गौरण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कपिलला हा पुरस्कार दुस-यांदा दिला जाणार आहे.यापूर्वी 2014मध्ये त्याला या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. हा कपिलला पुरस्कार पहलाज निहलानी,सुभाष देसाई,महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते दिला जाणार आहे.हा पुरस्कार कपिलच्या आयुष्यात नवी उमंग आणू शकतो,या पुरस्करामुळे त्याच्या करिअरला एक नवीन दिशा मिळू शकते अशा चर्चा रंगतायेत.त्यामुळे या पुरस्कारानंतर कपिलची इमेज कितपत बदलेल हे पाहणे रंजक ठरणार आहे. मुळात कपिल शर्मा त्याच्या टीमसह ऑस्ट्रेलियाला गेले होते.त्यावेळी सुनील ग्रोव्हरला कपिलने नोकर म्हणून संबोधले होते. या कारणांमुळे दोघांमध्ये चांगलाच वाद रंगला होता. हा वाद इतका चिघळत गेला की, सुनीलने कपिलसह त्याच्या शोमध्ये काम करण्यास नकार दिला.त्यामुळे कपिलल एकट्यालाच या शोची जबाबदारी सांभाळावी लागली.मात्र या दोघांचा वादाचा फटका द कपिल शर्मा या शोलाच जास्त बसल्याचे पाहायला मिळाले. कारण रसिक सुनील ग्रोव्हरला जास्त मिश करत होते. त्यामुळे सुनील ग्रोव्हर या शोमध्ये नसणार यांमुळे रसिकांनीही या शोला पाठ फिरवल्याचे चित्र होते. त्यामुळे शोची टीआरपीवरही परिणाम झाला होता. या सगळ्या गोष्टींमुळे कपिल थोडा चिंतीत असल्याचेही माहिती समोर येत होती. आता पुरस्कार मिळण्याची बातमी कपिलसाठी किपतपत लकी ठरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.