Join us  

‘कानपूरवाले खुराणाज’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 7:15 AM

मिश्कील स्वभावाचा एक मध्यमवर्गीय जिजा आपल्या सहा मेव्हण्या आणि एका सूत्रधारासोबत ‘स्टार प्लस’वर ‘कानपूरवाले खुराणाज’ शोमध्ये दाखल होणार आहे.

ठळक मुद्दे मिश्कील विनोदाची आतीषबाजी ‘कानपूरवाले खुराणाज’ मालिकेतविनोदवीर सुनील ग्रोव्हरचे छोट्या पडद्यावर कमबॅक

स्टार प्लसवरील ‘कानपूरवाले खुराणाज’ या नव्या मालिकेत मिश्कील विनोदाची आतीषबाजी होणार असून ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विनोदवीर सुनील ग्रोव्हरने या मालिकेत एका जिजाची भूमिका साकारली असून त्याच्या मदतीला त्याच्या सहा मेव्हण्याही आहेत. त्या अली असगर, उपासना सिंह आणि सुगंधा मिश्रा यांनी साकारल्या आहेत. या कार्यक्रमाचा सूत्रधार या नात्याने अपारशक्ती खुराणा आपल्या तिरकस शेरेबाजीची बरसात करणार आहे. शेजारच्यांच्या घरात काय चालले आहे, यात नाक खुपसणारी भोचक शेजारिणीच्या रूपात बॉलीवूडची नामवंत नृत्यदिग्दर्शिका व अभिनेत्री फराह खान दिसणार आहे.‘कानपूरवाले खुराणाज’ या नव्या कौटुंबिक विनोदी मालिकेत जिजा-मेव्हणी यांच्यातील संबंधांवर भर देण्यात आला असून २०१८ वर्षाची अखेर या नव्या मालिकेच्या प्रसारणाने होईल. या मालिकेत अनेक विनोदवीर वेळोवेळी सहभागी होणार असून त्यांचे संवाद, प्रसंग आणि नकला यांच्याद्वारे दर आठवड्यास एक नवी संकल्पना मालिकेत सादर केली जाईल. तसेच बॉलीवूडमधील संगीत, चित्रपट आणि अन्य क्षेत्रांतील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी हे या मालिकेत दर आठवड्यास विशेष अतिथीच्या रूपात सहभागी होणार असल्याने मालिकेचा ग्लॅमर आणि मनोरंजनाच्या स्तर खूपच उंचावणार आहे.विनोदवीर सुनील ग्रोव्हरने सांगितले, “‘कानपूरवाले खुराणाज’ या नव्या कौटुंबिक विनोदी मालिकेद्वारे मी पुन्हा टीव्हीच्या पडद्यावर परतत असल्याचा मला खूप आनंद होत आहे. यात मी प्रथमच एक वेगळ्या प्रकारचा जिजा झालो आहे. या भूमिकेमुळे सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात मला एक विनोदाचा शिडकावा मारण्याची संधी प्राप्त होत असल्यामुळे मी ही मालिका लगेच स्वीकारली. अन्य गुणी आणि नामवंत विनोदवीरांच्या संगतीत भूमिका साकारण्याचा अनुभव फारच उत्तम आहे.”या मालिकेविषयी अपारशक्ती खुराणा म्हणाला, “या मालिकेची विक्षिप्त संकल्पना आणि त्यातील चौकस विनोदामुळे मी ही मालिका स्वीकारली. शिवाय खुराणा कुटुंबाचा एक सदस्य या नात्याने मला त्यात भूमिकाही रंगविता येणार होती, हा अधिकचा लाभही झाला. इतक्या नामवंत विनोदी अभिनेत्यांबरोबर भूमिका साकारणे ही फारच अफलातून गोष्ट असून ही मालिका कधी सुरू होते आहे, असे मला झाले आहे. मला सूत्रसंचालन जितके आवडते, तितकाच अभिनय करायलाही आवडतो. त्यामुळे माझ्यासाठी ‘कानपूरवाले खुराणाज’ ही नक्कीच एक उत्तम संधी आहे.”

टॅग्स :कानपुरवाले खुराणाज्सुनील ग्रोव्हरफराह खान