Join us

​कान्हा म्हणजेच माधव देवचक्के सरस्वती या मालिकेत परतणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2017 12:57 IST

सरस्वती या मालिकेत माधव देवचक्के कान्हा ही भूमिका साकारत आहे. त्याच्या या भूमिकेला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. कान्हा हा ...

सरस्वती या मालिकेत माधव देवचक्के कान्हा ही भूमिका साकारत आहे. त्याच्या या भूमिकेला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. कान्हा हा गतीमंद मुलगा असल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आहे. एका गतीमंद मुलाची भूमिका माधवने खूपच चांगल्यारितीने साकारली आहे. माधवने साकारलेला कान्हा लहान मुलांमध्ये तर खूपच लोकप्रिय आहे. पण गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना कान्हाला मालिकेत पाहायला मिळत नाहीये. कान्हाला शिकण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात आले असल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आहे. कान्हा हा प्रेक्षकांचा लाडका असल्याने प्रेक्षक त्याला खूपच मिस करत आहेत. कान्हा मालिकेत परतणार कधी याची उत्सुकता या मालिकेच्या फॅन्सना लागली आहे. या मालिकेच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. कान्हा मालिकेत लवकरच परतणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे.सरस्वती या मालिकेत राघवचा मृत्यू झाल्याचे काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. राघव आणि सरस्वती फिरायला दुबईला गेले असता राघववर हल्ला झाला होता आणि त्याच्यात राघवचा मृत्यू झाला असल्याचे दाखवण्यात आले होते. पण आता राघव या मालिकेत परतला असून त्याचे एक वेगळेच रूप प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळत आहे. सरस्वतीवर अतिशय प्रेम करणारा राघव तिचा प्रचंड तिरस्कार करत आहे. पुढील काही भागांत मालिकेच्या कथानकाला अनेक वळणं मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. राघव ही भूमिका आस्ताद काळे साकारत आहे. माधव देवचक्केने हमारी देवरानीसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या तो मोह मोह के धागे या मालिकेत एक महत्त्वाची भूमिका साकारताना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. Also Read : मराठी मालिकांमध्ये कथा ही सगळ्यात महत्त्वाचीः आस्ताद काळे