Join us  

इंडियाज् बेस्ट ड्रामेबाजच्या मंचावर कमल हसन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2018 8:57 AM

झी टीव्हीवरील इंडियाज्‌ बेस्ट ड्रामेबाझ ह्या भारतातील एकमेव अभिनयावर आधारित रिॲलिटी शोने पुन्हा एकदा ह्या सीझनमध्ये प्रेक्षकांना थक्क केले आहे.

ठळक मुद्देकमल हसन आणि छोट्‌या कलाकारांची गट्टी अगदी मस्त जमली

झी टीव्हीवरील इंडियाज्‌ बेस्ट ड्रामेबाझ ह्या भारतातील एकमेव अभिनयावर आधारित रिॲलिटी शोने पुन्हा एकदा ह्या सीझनमध्ये प्रेक्षकांना थक्क केले आहे. यातील गोड लिटल ड्रामेबाझची निरागसता, खोडकर स्वभाव आणि अभिनय कौशल्य, परीक्षक हुमा कुरेशी, विवेक ओबेरॉय आणि ओमंग कुमार यांच्यातील मस्त केमिस्ट्री आणि सूत्रधार शांतनु महेश्वरी आणि विघ्नेश पांडे यांची धम्माल प्रेक्षकांना निश्चितपणे आवडली आहे. टॉप १२ हुशार स्पर्धक आपल्या अफलातून ॲक्ट्‌ससह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज असून ह्या वीकेन्डला महान नायक कमल हसन हे ह्या शोमध्ये सेलेब्रिटी अतिथीच्या रूपात दिसून येतील. ह्या सुपरस्टारने इंडियाज्‌ बेस्ट ड्रामेबाझच्या सेटला आपली सहकलाकार पूजा कुमारसोबत त्यांचा नवीन चित्रपट विश्वरूपमच्या प्रमोशनसाठी भेट दिली. 

ह्या एपिसोडची सुरूवात अगदी धूमधडाक्यात झाली. कमल हसन आणि छोट्‌या कलाकारांची गट्टी अगदी मस्त जमली आणि त्यांनी आपल्या डायलॉगबाजीसह सर्वांचे मस्त मनोरंजन केले. ह्या नौटंकी बच्चेकंपनीने खुद्द कमल हसन यांना ड्रामेबाझीचे धडेही दिले. स्पर्धक इनायतने त्यांना तिचा सिग्नेचर संवाद ‘दैय्या रे दैय्या, कैसा है मेरा सैय्या’ म्हणायला शिकवले, तर ड्रामेबाझ जोतसरूपच्या ‘सरदार शेर होते है चूहे नहीं’ संवादामुळे तर सर्वांची हसूनहसून पुरेवाट झाली. कमल यांनी अगदी खिलाडूवृत्तीने नौटंकी बच्चे कंपनीचे आव्हान स्वीकारले आणि आपल्या नन्ह्या मार्गदर्शकांकडून ‘ए’ मिळवला. एवढेच नाही तर ह्या सुपरस्टारने सदाबहार ‘सुरमयी अखियों में’ हे गाणे गाऊन ह्या संध्येला चारचांद लावले आणि इंडियाज्‌ बेस्ट ड्रामेबाझच्या मंचावर पुन्हा एकदा आपली जादू चालवली. असे आणि आणखी बरेच काही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ह्या वीकेन्डला इंडियाज्‌ बेस्ट ड्रामेबाझमध्ये पाहायला मिळेल.

टॅग्स :कमल हासनहुमा कुरेशी