Join us

‘काळभैरव रहस्य’मालिकेच्या वेळेत ‘मायावी मलिंग’ मालिका होणार छोट्या पडद्यावर दाखल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 13:10 IST

गेल्याचवर्षी ऑक्टोबरमध्ये राहुल शर्मा,छावी पांडे आणि सरगुन कौर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘काळभैरव रहस्य’ या मालिका छोट्या पडद्यावर दाखल ...

गेल्याचवर्षी ऑक्टोबरमध्ये राहुल शर्मा,छावी पांडे आणि सरगुन कौर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘काळभैरव रहस्य’ या मालिका छोट्या पडद्यावर दाखल झाली होती.मात्र काही कारणास्तव आता ही मालिका एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. काळभैरव मालिकेच्या जागी ‘मायावी मलिंग’ ही नवी कोरी मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहे.‘मायावी मलिंग’ ही मालिका प्रेक्षकांना एका काल्पनिक दुनियेत घेऊन जाईल, ज्यात तीन राजकन्या आपले राज्य टिकविण्याची धडपड करताना दिसतील.जीवनात नायक किंवा नेता बनण्याची उर्मी प्रत्येकाच्याच मनात वसत असते, हा संदेश प्रणाली, ईश्वर्या आणि गरिमा या तीन राजकन्यांची कथा देते.प्रणाली, ईश्वर्या आणि गरिमा या तीन राजकन्यांच्या भूमिका अनुक्रमे नेहा सोळंकी,वाणी सूद आणि ग्रेसी गोस्वामी या अभिनेत्री साकारणार असून हर्षद अरोरा आणि शक्ती आनंद हे अभिनेते महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.विवेक बहेल आणि ‘पेनिन्सुला पिक्चर’ यांची निर्मिती असलेल्या या मालिकेतील विशेष व्हीएफएक्स ‘प्राण स्टुडिओज’ ही जागतिक स्तरावर नावाजलेली कंपनी पुरविणार आहे.या स्पेशल इफेक्टमुळे प्रेक्षकांना अफलातून दृष्ये पाहायला मिळतील.‘काळभैरव रहस्य’ या सामाजिक थरारक मालिकेतील आपल्या नम्रताच्या भूमिकेने प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळविलेल्या छावी पांडे या रूपसुंदर अभिनेत्रीची एक गोष्ट फारशी कुणाला ठाऊक नसेल.अतिशय मेहनती कलाकार असलेली छावी पांडे ही एक उत्तम गायिकाही आहे. तिने गाण्याचे शास्त्रोक्त शिक्षणही घेतले आहे. अभिनयाच्या क्षेत्रात उतरण्यापूर्वी तिने काही गाण्यांच्या रिअ‍ॅलिटी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ऑडिशन्सही दिल्या होत्या. या संदर्भात तिच्याशी चर्चा केल्यावर तिने सांगितले, “मला गायिका व्हायचं होतं आणि म्हणूनच मी काही गाण्यांच्या रिअ‍ॅलिटी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ऑडिशन्सही दिल्या होत्या. पण आज मी जिथे आहे, त्याबद्दल मी खुश आहे. गायिका होण्यापेक्षा अभिनयाने मला अधिक लोकप्रिय बनविलं आहे. पण माझी गाण्याची आवड आजही कायम आहे. त्यामुळे मला जेव्हा केव्हा फावला वेळ मिळतो, तेव्हा रियाज करते. गाण्यामुळे मला वेगळाच आनंद मिळतो.” छावी हसून म्हणाली, “मी नातेवाईकांमध्ये असले की ते मला नेहमी गाणं म्हणण्याची फर्माईश करतात.” पारंपरिक चाकरीच्या मार्गापेक्षा वेगळा मार्ग अवलंबिणा-या सर्वांनी आपल्या कामावर श्रध्दा ठेवून पुढे जात राहिले पाहिजे आणि छोट्या-मोठ्या अपयशांनी खचून न जाता आपले प्रयत्न सुरूच ठेवले पाहिजेत, असे ती तरुणांना सांगते.