Join us

सीता-हनुमानाची जमली जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 14:35 IST

सिया के राम या मालिकेत सीतेची भूमिका साकारणारी मदिराक्षी मुंडले आणि हनुमानाची भूमिका साकारणारा दानिश अख्तर हे दोघे खूपच ...

सिया के राम या मालिकेत सीतेची भूमिका साकारणारी मदिराक्षी मुंडले आणि हनुमानाची भूमिका साकारणारा दानिश अख्तर हे दोघे खूपच चांगले मित्रमैत्रीण आहेत. मालिकेत काहीच दिवसांत प्रेक्षकांना युद्ध पाहायला मिळणार आहे. या युद्धासाठी सध्या सगळेच कलाकार जय्यत तयारी करत आहेत. यासाठी दानिश सध्या अनेक तास जिममध्ये घाम गाळत आहे. जिममध्ये मदिराक्षीही त्याला साथ देतेय. दानिश हा न चुकता रोज व्यायाम करतो. त्याच्यामुळे मदिराक्षीलाही जिमला रोज जाण्याची सवय लागली आहे. मदिराक्षीने गेल्या काही दिवसांत वर्कआऊट करून जवळजवळ पाच किलो वजन कमी केले आहे.