Join us
Daily Top 2Weekly Top 5

जॉन अब्राहम झाला माधुरी दीक्षितचा फॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 07:15 IST

परीक्षक बॉलिवूड मधील विविध सिनेमातील प्रसिध्द अवतार धारण करणार आहेत त्याचप्रमाणे स्पर्धक सुध्दा अनेक अवतार धारण करणार आहेत.

या आठवड्यात कलर्सचा डान्स दिवाने वर बॉलिवूडची फिल्मी थीम साजरी केली जाणार आहे. मागील काही वर्षातील बॉलिवूडचा प्रवास त्यात सादर केला जाणार आहे. परीक्षक बॉलिवूड मधील विविध सिनेमातील प्रसिध्द अवतार धारण करणार आहेत त्याचप्रमाणे स्पर्धक सुध्दा अनेक अवतार धारण करणार आहेत. माधुरी दीक्षित मुघल-ए-आझम या लोकप्रिय प्रेमकथेमधील अनारकलीच्या भूमिकेत दिसणार आहे तर तुषार कालिया शोले सिनेमातील गब्बरच्या भूमिकेत दिसणार आहेत आणि शशांक खेतान हम या सिनेमातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेत दिसणार आहेत. मनोरंजन अजून थोडे उंचावर नेणार आहे इंडस्ट्रीतील तगडा आणि मागणी असणारा अभिनेता जॉन अब्राहम त्याच्या सत्यमेव विजयते या सिनेमाच्या प्रमोशन साठी विशेष अतिथी बनून येणार आहे.

सिझा रॉय आणि करण परियारने केलेल्या सुरूवातीलाच प्रसिध्द धक धक करने लगा या बेटा सिनेमातील गाण्यावर नृत्य सादर केले आणि पाहण्यासारखे होते. त्यांच्या नृत्याने मंच उजळून निघाला आणि माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्यासारखे नृत्य करण्यात स्पर्धक कोठेही कमी पडले नाहीत. या कामगिरी विषयी बोलताना जॉन म्हणाला,“माधुरीजी असणारा हा डान्स माझ्या आवडत्या डान्स मधील एक आहे. या गाण्यात त्यांनी ज्या डौलदारपणे नृत्य केले आहे तो डौलदारपणा आताच्या पिढीतील कोणत्याही अभिनेत्रीत दिसू शकत नाही. ''

त्यानंतर प्रेक्षकांनी जॉनला चिअर करून माधुरी सोबत त्याच गाण्यावर डान्स करायला सांगीतले, तेव्हा तो लाजला आणि एखाद्या चाहत्यासारखा थोडा अस्वस्थही झाला. त्यांनी ती जादु पुन्हा दाखविली आणि जॉनने अनिल कपूर सारखा डान्स करण्याचा प्रयत्न केला. जॉनने सांगीतले, “या गाण्यावर त्यांच्या सोबत नृत्य करताना मी थोडा अस्वस्थ झालो होतो कारण मी 15 वर्षांपूर्वी माझे करियर चालू केले तेव्हापासून डान्स करत असलेल्या त्या एक सुंदर अभिनेत्री आहेत”.

टॅग्स :जॉन अब्राहममाधुरी दिक्षित