Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुश्मिताची जमणार रवीसोबत जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 10:57 IST

जमाई राजा ही मालिका लवकरच 20 वर्षांचा लीप घेणार आहे. लीपनंतर निया शर्माला या मालिकेत एका मुलाच्या आईची भूमिका ...

जमाई राजा ही मालिका लवकरच 20 वर्षांचा लीप घेणार आहे. लीपनंतर निया शर्माला या मालिकेत एका मुलाच्या आईची भूमिका साकारावी लागणार होती. त्यामुळे तिने ही मालिका करण्यासाठी नकार दिला. आता या या मालिकेत तिची जागा सुश्मिता भंडारी घेणार आहे. तसेच लीपनंतरही रवी दुबे वृद्धाची नव्हे तर एका तरुणाची भूमिका साकारणार आहे. या मालिकेत सुश्मिताची रवीसोबत जोडी जमणार आहे. सुश्मिताने ही बातमी फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवरून तिच्या फॅन्सना दिली आहे.