Join us
Daily Top 2Weekly Top 5

​जेनिफर विंगेट म्हणजेच बेहद या मालिकेतील मायाच्या डोहाळजेवणाचा सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2017 11:15 IST

बेहद या मालिकेच्या कथानकाला चांगलेच वळण मिळाले आहे. या मालिकेत माया म्हणजेच जेनिफर विंगेट गरोदर असल्याचे आपल्याला आता पाहायला ...

बेहद या मालिकेच्या कथानकाला चांगलेच वळण मिळाले आहे. या मालिकेत माया म्हणजेच जेनिफर विंगेट गरोदर असल्याचे आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. मायाच्या आयुष्यात येणाऱ्या या नव्या वळणामुळे ती चांगलीच खूश आहे. बाळाची येण्याची ती जय्यत तयारी करत आहे.बेहद ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेचे कथानक, या मालिकेतील व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेतील माया ही व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. आता ही मालिका लवकरच काही महिन्यांचा लीप घेणार आहे. लीपनंतर प्रेक्षकांना मायाचे डोहाळजेवण पाहायला मिळणार आहे. मायाचे डोहाळजेवण धुमधडाक्यात केले जाणार आहे. वंदना म्हणजेच स्वाती शाह आणि जान्हवी म्हणजे कविता घई यांच्या उपस्थितीत मायाचा डोहाळजेवणाचा सोहळा होणार आहे. या सोहळ्यात माया एक भला मोठा केक कापणार आहे आणि त्यानंतर विविध गंमतीदार खेळ खेळून मौजमजा करणार आहे. एक आदर्श आई होण्यासाठीची सर्व तयारी तिने सुरू केली आहे. आपल्या रागीट स्वभामुळे ओळखली जाणारी माया मातृत्वामुळे बदलेल का हे पाहाणे रंजक ठरणार आहे. मालिकेने लीप घेतल्यानंतर या मालिकेत अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. डोहाळजेवणाच्या सोहळ्याचे चित्रीकरण करण्यासाठी जेनिफर खूपच उत्साहित होती. ती सांगते, बेहद ही मालिका माझ्यासाठी खूपच खास आहे. या मालिकेत घेतल्या जाणाऱ्या लीपची मी आतुरतेने वाट पाहात आहे. कारण यानंतर मालिकेच्या कथानकात अनेक चढ-उतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या चढ-उतारामुळे मायाच्या आयुष्यात अनेक बदल घडणार आहेत.