Join us

"गेल्या १७ वर्षात कधीही...", असित मोदी-'दयाबेन'च्या रक्षाबंधनावर जेनिफर मिस्त्रीचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 15:00 IST

असित मोदींवर गंभीर आरोप करणारी आणि मालिकेत मिसेस सोढीच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने दिशा-असित मोदींच्या रक्षाबंधनावर टिप्पणी केली आहे.

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिका वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. आधी मालिकेचे निर्माते असित मोदींवर (Asit Modi) आरोप केल्याने अनेक कलाकार मालिका सोडून गेले. तसंच अनेक वर्षांपासून दयाबेन म्हणजे अभिनेत्री दिशा वकानीही मालिकेत दिसत नसल्याने ती कधी परत येणार अशी चर्चा होती. नुकतंच रक्षाबंधनाच्या दिवशी असित मोदी दिशा वकानीच्या घरी गेले होते. तिथे त्यांनी दिशाकडून राखी बांधून घेतली. तर असित मोदींवर गंभीर आरोप करणारी आणि मालिकेत मिसेस सोढीच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने (Jennifer Mistry) दिशा-असित मोदींच्या रक्षाबंधनावर टिप्पणी केली आहे.

'फिल्मीग्यान'ला दिलेल्या मुलाखतीत जेनिफर म्हणाली,"असित मोदी आणि दिशा वकानीच्या रक्षाबंधनाचा व्हिडिओ समोर आला. माझा प्रश्न आहे की गेल्या १७ वर्षात तुम्ही रक्षाबंधनाला दिशाच्या घरी गेला होतात का? आजपर्यंत तुमचा एकही फोटो, व्हिडिओ पाहिला नव्हता.बरोबर याचवर्षी तुम्ही व्हिडिओ वगरे शूट केला. हे तुम्ही इमेज क्लिअर करण्यासाठीच करत आहात हे स्पष्ट कळतंय. तसंच दिशा असितजींच्या घरील गेली असं बोललं जात आहे. पण तसं नाहीये. असितजी आणि पत्नी नीलाजी दिशाच्या घरी गेले होते. मला दिशाचं घर माहित आहे. तसंच दिशा एखाद्या चाहत्यालाही घरी यायला नकार देत नाही ती असितजींना का नकार देईल? तुम्ही पाहिलंत तर दिशा अनकंफर्टेबलही होती. ती हसतच नव्हती. "

जेनिफर मिस्त्रीने असित मोदींवर गेल्या वर्षी अनेक गंभीर आरोप केले होते. असित मोदींनी तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचंही ती म्हणाली होती. असित मोदींनी तिच्याशी बोलताना अश्लील कमेंट्सही वापरल्या होत्या ज्याला कंटाळून तिने मालिका सोडली होती. 

'तारक मेहता का उल्टा चश्मा' २००८ पासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेला १७ वर्ष झाली आहेत. शैलेश लोढा हे तारक मेहताच्या भूमिकेत दिसले. मात्र तीन वर्षांपूर्वीच त्यांनी ही मालिका सोडली. तर २०१७ सालीच लेकीच्या जन्मानंतर दिशा वकानीनेही मालिका सोडली. त्यानंतर अनेकदा दिशाच्या कमबॅकची चर्चा झाली, मात्र ती शेवटपर्यंत आलीच नाही. आजही ही मालिका दयाबेनशिवायच सुरु आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारतारक मेहता का उल्‍टा चश्‍मा