Join us  

८०च्या दशकातील या अभिनेत्याला रोमँटिक सीन देताना घाबरून फुटायचा घाम, जया प्रदा यांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 2:55 PM

बॉलिवूड अभिनेत्री जया प्रदा यांनी नुकतीच सोनी टीव्हीवरील इंडियन आयडॉल शोमध्ये हजेरी लावली होती.

बॉलिवूड अभिनेत्री जया प्रदा यांनी नुकतीच सोनी टीव्हीवरील इंडियन आयडॉल शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी चित्रपटात काम करतानाचे वेगवेगळे अनुभव शेअर केले. यावेळी कार्यक्रमाचा सूत्रसंचालक जय भानुशालीने विचारलेल्या कित्येक प्रश्नांची इंटरेस्टिंग उत्तरे दिली.

जया प्रदा यांनी भानुशाली यांच्या एका प्रश्नाचे उत्तर देताना अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबद्दल एक अनोखी स्टोरी सांगितली. शराबी चित्रपटातील गाण्याच्या शूटिंगवेळी आमिताभ बच्चन यांचा हात भाजला होता. त्यावेळी त्यांनी आपला हात लपवत डान्स करण्यासाठी वेगळ्या स्टेप्स बनवल्या होत्या, असे जया प्रदा यांनी सांगितले.

जय भानुशालीने जया यांना स्क्रीन समोर सहा दिग्गज अभिनेत्याचा फोटो दाखवले. यात धर्मेंद्र, राजेश खन्ना, जितेंद्र, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा आणि ऋषि कपूर होते. या सहा अभिनेत्यांसोबत काम करताना रोमँटिक दृश्य करताना कोणत्या अभिनेत्याला घाम फुटायचा ? हा प्रश्न जय भानुशालीने जया प्रदा यांना विचारले. त्यावर त्यांनी धर्मेंद्र यांचे नाव घेतले.

जया प्रदा यांनी सांगितले की, मला वाटते की धर्मेंद्र एक हिरोऐवजी मित्र म्हणून माझ्या खूप जवळ आहे. पण धर्मेंद्र यांना रोमँटिक सीन म्हटले की खूप भीती वाटायची. त्यामुळे ते त्या सीनसाठी खास तयारी करायचे. मात्र शूटिंगच्या वेळी मात्र ते काही वेगळेच करायचे.

जय भानुशालीने नंतर सहा कलाकारांमध्ये कंजूस कोण होते? हा प्रश्न विचारला. जयने त्यावर उत्तर दिले चुप. खामोश हा शत्रुघ्न सिन्हा यांचा प्रसिद्ध डायलॉग असल्यामुळे त्यांनी काही न म्हणताच उत्तर दिले. जया प्रदा यांनी या कार्यक्रमात काही स्पर्धकांच्या गाण्यावर डान्सदेखील केला. 

टॅग्स :जया प्रदाधमेंद्रअमिताभ बच्चनशत्रुघ्न सिन्हा