Join us

जावेद अली झाला भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2017 12:04 IST

सा रे ग म प या शोच्या येणारा भाग हा पापा डे स्पशेल एपिसोड असणार आहे. त्यानिमित्त अनेक स्पर्धकांचे ...

सा रे ग म प या शोच्या येणारा भाग हा पापा डे स्पशेल एपिसोड असणार आहे. त्यानिमित्त अनेक स्पर्धकांचे वडील सेटवर आले होते त्यांना पाहुन स्पर्धकांना चांगलाच आश्चर्याचा धक्का बसला.  यावेळी या शोच्या परीक्षकच्या भूमिकेत असलेल्या जावेद अली यांचे आई-वडिलही या मंचावर आले होते. आपल्या आईवडिलांना अनपेक्षितपणे सेटवर पाहुन जावेद अलीला आपले अश्रू आवरता आले नाहीत. जावेदेच बालपण अत्यंत हालाखीच्या परिस्थिती गेले. जावेद यांची आई  कपडे शिवून तर वडिल काही फुटकळ कामे करून उदरनिर्वाह करत होते. जावेद याच्या आयुष्यात असा एक काळ होता ज्यावेळी त्याच्या डोक्यावर छतही नव्हते. जावेदने अथक परिश्रम करुन आपल्या करिअरमध्ये मोठा पल्ला गाठला आहे आणि त्याचे नाव देशातील टॉप 10 च्या गायकांमध्ये सामील आहे. नगाडा बजाओ, कजरा रे, गुजारिश अशी एकपेक्षा एक गाणी त्यांने बॉलिवूडला दिली आहेत. उत्तम आवाज लाभलेल्या जावेदने आपल्या गायनाच्या आवडीसाठी मुंबईला जायचा निर्णय घेतला. पण नियतीच्या मनात काही वेगळे होते. त्याच वेळेस तरूण वयामुळे त्यांचा कंठ फुटला आणि आवाज बदलला. तेव्हा तो घरी परत गेला. यानंतर त्याला गुरुकडून संगीताचे शिक्षण देण्याचा निर्णय त्याच्या आईवडिलांनी घेतला. वर्षभरानंतर जावेद पुन्हा एकदा मुंबईत आला आणि आपल्या करिअरला सुरुवात केली. आपल्या आईवडिलांना सा रे ग म प लिटल चॅम्प्सच्या मंचावर पाहून पाणावलेल्या डोळ्‌यांनी जावेद म्हणाला, “हे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम सरप्राईजेसपैकी एक आहे. हा खरं तर माझ्यासाठी भावुक क्षण आहे. माझ्या यशाचे श्रेय मी अल्लाह आणि माझ्या आईवडिलांना देतो. त्यांनी माझ्यासाठी खूप त्याग केला आहे. मला एवढे सुंदर गिफ्ट देण्यासाठी मी मनापासून आभार मानतो.”