Join us

जझबात संगीन से नमकीन तक या कार्यक्रमात श्रद्धा आर्याने सांगितली तिच्या मोडलेल्या लग्नाची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 15:22 IST

झी टीव्हीवरील वीकेन्ड चॅट शो जझबात संगीन से नमकीन तक हा प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या सेलेब्रिटीजच्या आयुष्यात डोकावण्याची संधी देतो. ...

झी टीव्हीवरील वीकेन्ड चॅट शो जझबात संगीन से नमकीन तक हा प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या सेलेब्रिटीजच्या आयुष्यात डोकावण्याची संधी देतो. या शोमध्ये रोहित आणि रोनित रॉय, अदा खान, दिव्यांका त्रिपाठी, धीरज धूपार, राखी सावंत, बरूण सोबती, करण पटेल आणि अशा अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली आहे. या शो च्या आगामी भागामध्ये झी टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय शो कुमकुम भाग्य आणि कुंडली भाग्यमधील देखणा मिशाल रहेजा आणि श्रद्धा आर्या या शो चा सूत्रधार राजीव खंडेलवालसोबत हलक्याफुलक्या गप्पा मारणार आहेत.मिशाल आणि श्रद्धा यांनी या इंडस्ट्रीमधील त्यांच्या प्रवासातील अनेक रोचक क्षण तसेच त्यांच्या आयुष्यातील काही संगीन आणि नमकीन क्षणांबद्दल सांगितले. या एपिसोडमध्ये राजीवने श्रद्धाला तिच्या गतआयुष्यातील नात्यांबद्दल आणि मोडलेल्या साखरपुड्‌यातून तिने स्वतःला कसे सावरले याबद्दल विचारले. त्यावर श्रद्धाने सांगितले, “माझा एका मुलासोबत साखरपुडा झाला होता. हे लग्न माझ्या घरातल्यांनी ठरवले होते. पण ते काही नीट जमले नाही. जसजसा वेळ गेला तसे आमचे नाते फारच कडवट झाले आणि त्यात खूप समस्या निर्माण झाल्या. आम्हाला त्याचा खूप त्रास झाला. आम्ही आमचे १०० टक्के दिले. पण अखेर आपापला मार्ग निवडला. त्यामुळे माझ्या वैयक्तिक अनुभवावरून मी हे शिकले आहे की, जर तुम्हांला असे वाटत असेल की तुमचे नाते अशा अंतिम ठिकाणी पोहोचले आहे जिथून कुठलीच वाट फुटत नाही, तर तुम्ही निश्चितपणे बोलायला हवे.”पुढे याच भागात मिशाल आणि श्रद्धा यांनी एक डान्स केला आणि राजीवसोबत काही मस्तीपूर्ण अॅक्टिव्हिटीजही केल्या. एवढेच नाही त्यांनी आपल्या आयुष्यातील काही गुपितेही उघड केली. या दोन लोकप्रिय व्यक्तिमत्त्वांसह या शनिवारचा जझबातचा एपिसोड निश्चितपणे मनोरंजक असणार आहे. जझबात संगीन से नमकीन तक या कार्यक्रमाच्या आजवरच्या भागांप्रमाणे हा भाग देखील प्रेक्षकांना आवडेल अशी या टीमला खात्री आहे.Also Read : मोहित मलिकने सांगितले, कठीण काळात आदितीला विकावे लागले होते तिचे दागिने