सहीं पकडे है...अंगूरी भाभी शो सोडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 07:17 IST
घराघरात पोट धरून हसवायला लावणाºया ‘भाभी जी घर पे हैं’ या मालिकेतील अंगुरी भाभी आणि त्यांचा ‘सही पकडे है’ ...
सहीं पकडे है...अंगूरी भाभी शो सोडणार
घराघरात पोट धरून हसवायला लावणाºया ‘भाभी जी घर पे हैं’ या मालिकेतील अंगुरी भाभी आणि त्यांचा ‘सही पकडे है’ हा डायलॉग कदाचित फार काळ ऐकता येणार नाही. अंगुरी भाभीची भूमिका साकारणारी शिल्पा शिंदे आणि या मालिकेच्या निर्मात्यांमध्ये खटके उडाल्याची बातमी आहे. याचमुळे शिल्पाने या मालिकेला बायबाय करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. शिल्पानेही यास दुजोरा दिला आहे. मी प्रकृती कारणास्तव शो सोडण्याच्या निर्णयाप्रत आले आहे. शोच्या निर्मात्यांकडून मला मानसिक त्रास दिला जात आहे. हा शो सोडून अन्य कुठल्याही चॅनलसाठी काम केल्यास माझे करिअर संपवण्याची भाषा वापरली जात आहे. गळ्यात संसर्ग झाला. पण मला डॉक्टरांकडे जाण्यासाठीही वेळ दिला गेला नाही, अशा अनेक तक्रारींचा पाढा तिने वाचला. दरम्यान शोच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा अलीकडे स्वत:चे पोशाख वापरू लागली आहे. तिने एक पर्सनल स्टायलिस्टही ठेवला आहे. हा खर्च निर्मात्यांना पेलवेनासा झाला आहे.