Join us

​हे सेलिब्रिटी रिल नाही तर रियलमध्येही करतायत एकमेकांना डेट ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2016 13:47 IST

छोट्या पडद्यावरील 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' या मालिकेतील देव (शाहीर शेख) आणि सोनाक्षी (एरिका फर्नांडिस)ची जोडी रसिकांना ...

छोट्या पडद्यावरील 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' या मालिकेतील देव (शाहीर शेख) आणि सोनाक्षी (एरिका फर्नांडिस)ची जोडी रसिकांना सध्या चांगलीच भावतेय. त्यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री, त्यांचे प्रेम रसिकांना आकर्षित करतंय. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचं गुपित हळूहळू उघड होऊ लागलंय. दोघांमध्ये ऑफ स्क्रीनसुद्धा चांगलीच केमिस्ट्री असून बराच वेळ सेटवर दोघं एकत्र घालवतात. त्याची झलक ऑन स्क्रीन केमिस्ट्रीमध्ये उमटेतय. दोघं एकमेंकांना डेट करत असल्याच्या चर्चाही सेटवर सुरु आहेत. मात्र याआधी एका इंडोनेशियन तरुणीला डेट करणा-या शाहीरनं याचा इन्कार केलाय. एरिका एक चांगली अभिनेत्री असून दोघंही आपण मित्र असल्याचं तो म्हणतोय. तर एरिकानंही शाहीरच्या सूरात सूर मिसळत मैत्रीचे गोडवे गायलेत.