Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तुला पाहते रे' मालिकेतील ईशा निमकर 'या' व्यक्तीचे गाते गोडवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 14:10 IST

झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. टीआरपीच्या यादीतही ही मालिका नेहमी अग्रस्थानी असल्याचं पाहायला मिळतं.

ठळक मुद्दे ईशा आणि ईशाची आई हि जोडी देखील अगदी लोकप्रिय आहेगायत्री आणि गार्गी यांची ऑनस्क्रीन व ऑफस्क्रीन केमिस्ट्री देखील तितकीच चांगली आहे

झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. टीआरपीच्या यादीतही ही मालिका नेहमी अग्रस्थानी असल्याचं पाहायला मिळतं. या मालिकेतील ईशा आणि ईशाची आई हि जोडी देखील अगदी लोकप्रिय आहे.

ईशाची आई जितकी स्पष्टवक्ती आहे तितकीच मायाळू देखील आहे. गायत्री आणि गार्गी यांची ऑनस्क्रीन व ऑफस्क्रीन केमिस्ट्री देखील तितकीच चांगली आहे.

मदर्स डे निमित्त गायत्रीने तिच्या ऑनस्क्रीन व ऑफस्क्रीन आईबद्दल सांगताना म्हणाली, "गार्गी ताई सोबत काम करणं म्हणजे धमाल. ती एक कमालीची अभिनेत्री आहे आणि मी तिच्याकडून खूप काही शिकतेय. ती ज्या सहजतेने अभिनय करते तसंच तिचं भाषेवरचं प्रभुत्व हे सगळं वाखाण्याजोगं आहे आणि मी तिच्याकडून जितकं शिकता येईल तितकं शिकतेय. मी तिच्यासाठी नक्कीच एक सरप्राईज प्लॅन करेन.

माझ्या आई सोबत माझं खूप घट्ट बॉण्डिंग आहे. ती मला नेहमीच प्रोत्साहन देते. पण मला असं वाटतं कि आई वरील प्रेम व्यक्त करण्यासाठी एकच दिवस पुरेसा नाही आहे. ती जेव्हा माझ्यासोबत असते तो प्रत्येक दिवस माझ्यासाठी मदर्स डे आहे."  

टॅग्स :तुला पाहते रेगायत्री दातार