Join us
Daily Top 2Weekly Top 5

​पृथ्वी वल्लभ या मालिकेत आशिष शर्मा आणि सौरव गुर्जरवर चित्रीत करण्यात आले हे कठीण दृश्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 17:38 IST

पृथ्वी वल्लभ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली असून या मालिकेत दोन योद्धांची एक अनोखी कथा दाखवली जात आहे. ...

पृथ्वी वल्लभ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली असून या मालिकेत दोन योद्धांची एक अनोखी कथा दाखवली जात आहे. या मालिकेची कथा युद्धभूमीतल्या द्वेषापासून सुरू झाली असून त्यात एक प्रेम कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिके मध्ये आशिष शर्मा, सोनारिका भदोरिया, पवन चोप्रा, शालिनी कपूर, अलेफिया कपाडिया, जतिन गुलाटी, पियाली मुंशी, सुरेंद्र पाल यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. पृथ्वी वल्लभ या मालिकेसाठी सध्या आशिष शर्मा प्रचंड मेहनत घेत आहे. नवनवी आव्हाने स्वीकारण्यास तत्पर असलेला हा नट, वर्ल्ड रेसलिंग एन्टरटेंमेंट मध्ये लवकरच पदार्पण करीत असलेल्या सौरव गुर्जर या भारतीय मल्लाशी लढाई करताना दिसणार आहे.
सौरव पृथ्वी वल्लभ या मालिकेत राजा गोहिलच्या भूमिकेत दिसणार आहे. राजा गोहिल हा ६ फुट ७ इंच उंच असून पृथ्वी वल्लभचे शासन असलेल्या प्रदेशाकडे जाणार्‍या महामार्गावर तो अतिक्रमण करणार आहे. सौरवने याआधी संकट मोचन महाबली हनुमान मालिकेत रावणाची भूमिका साकारली होती. पौराणिक मालिकेत काम केल्यानंतर सौरव आता ऐतिहासिक मालिकेत काम करणार आहे. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या वेळी सौरवसोबत लढाई करण्याविषयी आशीष सांगतो, “सौरवची या मालिकेत छोटीशी भूमिका आहे. त्याच्यातील आणि माझ्यातील एक युद्ध दाखवण्यासाठी निर्मात्यांनी त्याची निवड केली आहे. मी ५’१०” आहे आणि सौरव ६’७”, ज्याच्यामुळे हे लढाईचे दृश्य चित्रित करणे आम्हाला थोडे अवघड गेले. या लढाईच्या दृश्यात दोर्‍या आणि हार्नेसचा खूप उपयोग केला गेला आहे. आम्ही त्यात धावतो, उड्या घेतो, एकमेकांना मारतो. हे सर्व प्रेक्षकांना बघायला आवडेल. या दृश्याचे चित्रीकरण सुंदर झाले आहे आणि ते दृश्य ज्या प्रकारे साकारले आहे ते पाहून आम्ही खुश झालो आहोत. सौरवसोबत काम करायला खूप मजा आली. आमच्या शॉट्सच्या मधल्या विश्रांतीत आम्ही कुस्ती जगताबद्दल गप्पा मारल्या. मी लहानपणापासूनच WWE चा मोठा चाहता आहे.”

Also Read : गुरदीप कोहली पृथ्वी वल्लभमध्ये झळकणार या भूमिकेत