सलील अंकोला काही वर्षांपूर्वी पॉवर कपल या कार्यक्रमात त्याच्या पत्नीसोबत झळकला होता. या कार्यक्रमात त्याने त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी त्याच्या फॅन्सना सांगितल्या होत्या. सलील अंकोला हा छोट्या पडद्यावरचा एक प्रसिद्ध अभिनेता होता. पण प्रसिद्धीच्या झोतात असतानाच तो छोट्या पडद्यापासून दूर झाला होता. सलील छोट्या पडद्यापासून का दूर झाला होता हे तुम्हाला कळले तर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. सलील दारूच्या अधीन गेला होता. त्याला या दारुच्या नशेतून सोडवणे त्याच्या कुटुंबियांना देखील कठीण झाले होते आणि त्याचमुळे त्याला पुण्याच्या रिहॅबिटेशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. सलील अनेक दिवस तिथेच होता. त्या दरम्यान ठरावीक व्यक्तींनाच त्याला भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. सलील सतत दारू पित असल्याने तो डिप्रेशनमध्ये देखील गेला होता. या सगळ्या गोष्टीमुळेच त्याला उपचाराची नितांत गरज होती. पण या रिहॅबमधून बाहेर पडल्यावर त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलले. काही वर्षांपूर्वी सलीलने दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की, तुम्हाला मदतीची गरज आहे याची जाणीव ज्यावेळी तुम्हाला स्वतःला होते. त्याचवेळी समोरची व्यक्ती तुम्हाला मदत करू शकते. मला याची जाणीव झाल्यानेच मी या सगळ्यातून बाहेर पडू शकलो. आता माझ्या समोर कोणी दारूची अख्खी बॉटल जरी ठेवली तरी मला फरक पडत नाही. मी माझ्या आयुष्यात खूप वाईट परिस्थितीतून गेलो आहे. पण आता दारूला मी शिवत देखील नाही.
Also Read : सलील अंकोलाला साकारायची आहे ही भूमिका