Join us

शिव ठाकरेच्या अमरावतीमधील घरी पोहचली ईशा मालवीय, मराठमोळं स्वागत पाहून भारावली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 12:26 IST

नुकतंच अभिनेत्री ईशा मालवीय शिव ठाकरेच्या अमरावतीमधील घरी पोहचली होती.

'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे याने समस्त मराठी प्रेक्षकांसह हिंदी प्रेक्षकांचेही मन जिंकून घेतले. मराठीनंतर त्याने हिंदी 'बिग बॉस'ही गाजवलं. यानंतर शिवने वेगवेगळ्या रिअ‍ॅलिटी शोमधून प्रेक्षकांची भेट घेतली.  मुळचा अमरावतीचा असलेला शिव ठाकरे हा एक कौटुंबिक मुलगा आहे. त्याला आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायला खूप आवडतं.  बरेचदा तो आपली भाची आणि आजी सोबत मस्ती करतानाचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतो. नुकतंच शिव ठाकरेच्या अमरावतीमधील घरी अभिनेत्री ईशा मालवीय पोहचली होती.    ईशाने शिवच्या अमरावती येथील घरी नुकतीच भेट दिली. ज्याचे फोटो समोर आले आहेत. ईशा शिवच्या घरी पोहोचल्यावर शिवच्या कुटुंबाने तिचं अगदी मनापासून आणि मराठमोळ्या पद्धतीने स्वागत केलं.  शिवच्या आईने ईशाला एक सुंदर मराठमोळी साडी भेट दिली. या स्वागतामुळे ईशा खूप भारावून गेल्याचे दिसलं.

शिव आणि ईशा हे रिअ‍ॅलिटी टीव्ही शोजच्या निमित्ताने एकत्र आले आणि त्यांची मैत्री खूप घट्ट झाली आहे. अनेकदा कार्यक्रमांमध्ये तसेच प्रमोशनसाठी हे दोघे एकत्र दिसतात आणि त्यांच्यातील हे मैत्रीपूर्ण संबंध नेहमीच चर्चेत असतात. शिव आणि ईशा चा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. मनमिळाऊ स्वभावामुळे शिवची 'आपला माणूस' अशी एक वेगळी ओळख आहे. चाहते शिव आगामी प्रोजक्टबद्दल उत्सुक आहेत. तसेच काही चाहत्यांनी शिव आणि ईशा यांना एकत्र पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Isha Malviya visits Shiv Thakare's Amravati home, overwhelmed by welcome.

Web Summary : Isha Malviya visited Shiv Thakare's Amravati home, receiving a warm, traditional Marathi welcome from his family. Shiv's mother gifted her a saree. Their friendship, formed through reality shows, is widely admired by fans eager to see them collaborate on future projects.
टॅग्स :शीव ठाकरेटिव्ही कलाकार