बोल्ड फोटो पोस्ट केल्यामुळे तुम्ही चर्चेत येतात असे आता अभिनेत्रींना वाटत असल्याने त्या चर्चेत येण्यासाठी सध्या हा मार्ग अवलंबत आहेत असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. ईशा गुप्ता तिच्या फोटोंमुळे चांगलीच फेमस झाल्याने आता मंदनादेखील हाच मार्ग अवलंबवला आहे. तिने तिच्या टॉपलेस फोटोसोबत आणखी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तर तिचा खूपच जास्त बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.
मंदना करिमी बिग बॉस या कार्यक्रमामुळे प्रकाशझोतात आली. या कार्यक्रमानंतर ती काही चित्रपटांमध्ये झळकली होती. सध्या ती तिच्या घटस्फोटाच्या प्रकरणामुळे चर्चेत आहे. तिचे काही महिन्यांपूर्वी गौरव गुप्तासोबत लग्न झाले होते. पण तिने गौरवविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. मात्र हे करत असलेले आरोप चुकीचे असल्याचा दावा एका वेबसाईटने केला होता.
मंदना आता तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली असून तिच्या या फोटोंना अनेक लाईक्स आणि शेअर मिळत आहेत.
Also Read : इशा गुप्ताने केले हॉट फोटोशूट