Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘जमाई राजा’त इंद्रनीलची एन्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2016 19:46 IST

झी टीव्ही वरील ‘जमाई राजा’ या लोकप्रीय मालिकेतील नवे बदल प्रेक्षकांना एकापाठोपाठ एक असे धक्के देणारे ठरताहेत. मग तो ...

झी टीव्ही वरील ‘जमाई राजा’ या लोकप्रीय मालिकेतील नवे बदल प्रेक्षकांना एकापाठोपाठ एक असे धक्के देणारे ठरताहेत. मग तो डीडीचा(अचिंत कौर) आकस्मिक मृत्यू असो वा मालिकेतील सर्वाधिक आवडते जोडपे सिड (रवी दुबे) व रोशनी(निया शर्मा) यांचे अनपेक्षितपणे विभक्त होणे असो. आता मालिकेने दोन वर्षांचा लीप घेतला आहे. यानंतर मालिकेत देव सेनगुप्ता(इंद्रनील सेनगुप्ता) या यशस्वी व धनाढ्य उद्योगपतीची एन्ट्री होत आहे. गेले अनेक महिने चित्रपटांमध्ये बिझी असल्याने इंद्रनीलला छोट्या पडद्यासाठी वेळ मिळाला नव्हता. पण आता तो ‘जमाई राजा’त पूर्ण लांबीची भूमिका साकारत आहे. हा अबोल व दानशूर उद्योगपती हळूहळू रोशनीत गुंतत जातो. त्याला सिड व रोशनीच्या कडवट नात्याबद्दल काहीच कल्पना नसते. त्यामुळे रोशनीबद्दल त्याला आकर्षण वाटू लागतं. पण नियतीला काही वेगळेच मंजूर  असतं, ज्याची देवलाही कल्पना नसते, अशा वळणाने मालिका जाणार आहे. इंद्रनील या भूमिकेसाठी अतिशय उत्साही आहे. आता या महत्त्वाच्या टप्प्यावर सिड-रोशनी परत एकमेकांविरोधात वागतील का, रोशनी सिडला माफ करील की देवला साथ देईल, हे साथ देण्यासाठी ‘जमाई राजा’ बघायला हवी.