Join us  

‘शन्मुखला हाकला, आदित्य नारायण लाज बाळग’; ‘Indian Idol 12’चा एपिसोड पाहून पुन्हा भडकले चाहते

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 10:50 AM

‘Indian Idol 12 : ‘इंडियन आयडल 12’ने पुन्हा ओढवून घेतला वाद, पुन्हा नेटक-यांनी केले ट्रोल

ठळक मुद्देअलीकडे ‘इंडियन आयडल 12’च्या ‘किशोर कुमार स्पेशल एपिसोड’वर प्रचंड टीका झाली होती.

काल प्रसारित झालेल्या ‘इंडियन आयडल 12’च्या (Indian Idol 12) एपिसोडवर पुन्हा एकदा टीकेची झोड उठली आहे. कालच्या या एपिसोडला रूपकुमार राठोड, कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल असे दिग्गज स्पेशल गेस्ट म्हणून लाभले. या एपिसोडमध्ये सुप्रसिद्ध संगीतकार श्रवण राठोड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. साहजिकच नदीम-श्रवण या गोडजोळीची अनेक रोमॅन्टिक गाणी शोमध्ये सादर केली गेलीत. पण यादरम्यान शन्मुखप्रियाचा ( Shanmukhapriya) परफॉर्मन्स बघून पुन्हा एकदा चाहते संतापले. याआधी इंडियन आयडल 12 च्या ‘किशोर कुमार स्पेशल एपिसोड’वरून चाहते असेच भडकले होते.शन्मुखप्रिया व आशीष कुलकर्णी या दोघांनी ‘हमको सिर्फ तुमसे प्यार है’ हे गाणे सादर केले. यावेळी शन्मुखचा परफॉर्मन्स बघून चाहत्यांनी तिला जबरदस्त ट्रोल केले. शन्मुख प्रिया कृपा करून आमच्यावर दया कर आणि शो सोडून जा, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या.

शन्मुखप्रियाने एका सुंदर गाण्याची वाट लावली. हमको सिर्फ तुमसे प्यार है, या इतक्या सुंदर गाण्याचा बँड वाजवला. कुणीतरी तिला शोबाहेर हाकला, असे एका युजरने लिहिले. 

काहींनी तिचे एक्स्प्रेशन पाहून तिला ओव्हरअ‍ॅक्टिंग की दुकान म्हणत संताप व्यक्त केला. ‘बस कर बहेन रूलायेगी क्या़ निकलती क्यू नहीं तुम ओव्हर अ‍ॅक्टिंग की दुकान’, अशा शब्दांत एका युजरने तिला ट्रोल केले.

आदित्य नारायणवरही निघाला रागकालच्या एपिसोडमध्ये शोचा होस्ट आदित्य नारायणनेकिशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांची अप्रत्यक्षणपणे खिल्ली उडवली. ते पाहूनही युजर्स भडकले. 

अमित कुमार यांच्यावर जाणीवपूर्वक खिल्ली उडवणा-या आदित्यला लाज वाटायला हवी, असे एका युजरने त्याला सुनावले.

शेम आून यू आदित्य नारायण आणि हिमेश रेशमिया़ तुमच्यात अमित कुमार यांच्या 0.0001 टक्केही टॅलेंट नाही, असे लिहित एका युजरने आपला संताप व्यक्त केला.

अलीकडे ‘इंडियन आयडल 12’च्या ‘किशोर कुमार स्पेशल एपिसोड’वर  प्रचंड टीका झाली होती आणि यानंतर किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार (Amit Kumar) यांनी शोबद्दल धक्कादायक खुलासा करून खळबळ उडवून दिली होती.  स्पर्धक कसेही गायले तरीही त्यांचे कौतुकच करायचे आहे, असे मला सांगितले गेले होते. जे मला सांगितले तेच मी केले, असा खुलासा अमित कुमार यांनी केला होता. त्यांच्या या खुलाशानंतर शोचा होस्ट आदित्य नारायणने (Aditya Narayan) अमित कुमार यांना खरीखोटी सुनावली होती. मात्र यानंतरही मेकर्सचा अमित कुमार यांच्यावरचा राग कदाचित शांत झालेला नाही. आता आदित्य पुन्हा एकदा अमित कुमार यांच्यावर निशाणा साधला.

‘मी सानू दा, रूप कुमार राठोड व अनुराधाजींना एक प्रश्न विचारू इच्छितो की, त्यांनी मनापासून स्पर्धकांचे कौतुक केले की आमच्या टीमने  करायला सांगितले म्हणून ते कौतुक करताहेत?,’ असा प्रश्न आदित्यने कालच्या एपिसोडमध्ये विचारला. त्याने अमित कुमार यांचे नाव घेतले नाही. पण त्याचा इशारा त्यांच्याकडेच होता, हे जगाला कळल्यावाचून राहिले नाही. यावरूनच आदित्य ट्रोल झाला.

टॅग्स :इंडियन आयडॉलआदित्य नारायणअमित कुमारकिशोर कुमार