Join us

मिहिकाने बनवला टॅटू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 11:23 IST

ये है मोहोब्बते या मालिकेत मिहिका अय्यरची भूमिका साकारणाऱ्या मिहिका वर्माने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. पण तिने आता अभिनयाला ...

ये है मोहोब्बते या मालिकेत मिहिका अय्यरची भूमिका साकारणाऱ्या मिहिका वर्माने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. पण तिने आता अभिनयाला रामराम ठोकला आहे. काही महिन्यांपूर्वी तिने आनंद या अमेरिकेतील व्यवसायिकाशी लग्न केले. लग्नानंतर ती अमेरिकेलाच सेटल झालेली आहे. छोट्या पडद्यापासून दूर असली तरी मिहिका आजही सोशल मीडियाद्वारे आपल्या फॅन्सच्या संपर्कात आहे. तिने इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. तिने तिच्या नवऱ्याच्या नावाचा टॅटू हातावर बनवला आहे. या फोटोला तिच्या फॅन्सचे अनेक लाईक आणि कमेंट तिला मिळत आहेत.