Join us

"पूर्ण मुंबईसोबत झोपतोय...", अनुषा दांडेकरने नाव न घेता एक्स करण कुंद्राची काढली इज्जत! सुनावले खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 10:24 IST

Anusha Dandekar : अनुषा दांडेकरने करण कुंद्राबद्दल अनेक खुलासे केले आहेत. अनुषाने सांगितले आहे की, तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिच्या पाठीमागे खूप काही केले पण तिला काहीच कळले नाही. करणचे नाव न घेता तिने खूप काही बोलून दाखवले आहे.

व्हीजे आणि अभिनेत्री अनुषा दांडेकर(Anusha Dandekar )ने करण कुंद्रा(Karan Kundra)सोबतच्या तिच्या भूतकाळाबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्री आणि व्हीजेने दावा केला आहे की तिने एकदा एका डेटिंग ॲपच्या माध्यमातून करणसाठी एक मोहीम चालवली होती, पण नंतर तिला कळले की करण त्याच प्लॅटफॉर्मचा वापर इतर महिलांना भेटण्यासाठी करत होता. अनुषा आणि करण कुंद्रा यांनी वेगळे होण्यापूर्वी अनेक वर्षे एकमेकांना डेट केले होते. एमटीव्ही लव्ह स्कूलसारख्या प्रोजेक्ट्समधून त्यांच्या नात्याचा खूप गाजावाजा झाला होता. पण आता, अनुषाने त्यांच्या एकत्र घालवलेल्या वेळेतील वाईट बाजूबद्दल बोलण्याचा निर्णय घेतला आहे.

रेडिटवर व्हायरल झालेल्या एका मुलाखतीत तिने खुलासा केला की, त्यांच्या नात्यादरम्यान तिने तिच्या बॉयफ्रेंडला बंबल नावाच्या एका डेटिंग ॲपसाठी मोहीम सुरू करण्यात मदत केली होती, पण नंतर तिला हे जाणून धक्का बसला की तो कथितरित्या इतर महिलांशी जोडण्यासाठी त्याचा वापर करत होता.

करणचे नाव न घेता बोललीकरणचे नाव न घेता तिने म्हटले, ''डेटिंग ॲप्ससोबतचा माझा सर्वात अनोखा अनुभव तेव्हा होता जेव्हा मला एका डेटिंग ॲपसाठी मोहीम करण्यासाठी साइन करण्यात आले होते आणि त्या वेळी माझ्या बॉयफ्रेंडने देखील माझ्यासोबत मोहीम करण्यासाठी डील निश्चित केली होती. या मोहीमसाठी त्याला आयुष्यात आतापर्यंतचे सर्वात जास्त पैसे मिळाले आहेत आणि त्याने डेटिंग ॲपचा वापर मुलींशी बोलण्यासाठी आणि भेटण्यासाठी केला आणि आम्ही एकत्र मोहीम करत होतो.''

अनुषाने केला खुलासाअनुषाने पुढे सांगितले की, ''जेव्हा तिला कळले की करण अनेकदा विश्वासघातकी राहिला आहे, तेव्हा तिला फसवल्यासारखे वाटले. तिने स्पष्ट कमेंट करताना त्याच्यावर 'संपूर्ण मुंबईसोबत झोपण्याचा' आरोप लावला.'' तिने पुढे म्हटले, ''जसे की, आम्ही एकत्र असायला हवे, तो याचा वापर मुलींशी बोलण्यासाठी आणि भेटण्यासाठी करत आहे, जे मला खूप नंतर कळले जेव्हा मला कळले की तो संपूर्ण मुंबईसोबत झोपत आहे.''

करण आणि तेजस्वी प्रकाश आहेत रिलेशनशीपमध्येदरम्यान, करण कुंद्राने अजूनपर्यंत या नवीन आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हा अभिनेता २०२१ पासून बिग बॉस १५ फेम तेजस्वी प्रकाशसोबत नात्यात आहे आणि दोघे टेलिव्हिजनच्या सर्वात चर्चित कपल्सपैकी एक बनून राहिले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Anusha Dandekar accuses ex Karan Kundra of infidelity, 'sleeping around'.

Web Summary : Anusha Dandekar accuses ex-boyfriend Karan Kundra of using a dating app they promoted together to meet other women. She claims he was unfaithful, alleging he was 'sleeping around' while they were together. Karan is yet to respond to the allegations.
टॅग्स :अनुषा दांडेकरकरण कुंद्रा