Join us  

'पुन्हा कॉन्ट्रोव्हर्सी झाली तर..'; प्रियदर्शनीने शेअर केला ओंकार राऊतचा खासगी व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 4:15 PM

Priyadarshani indalkar: प्रियदर्शनीने पुन्हा एकदा ओंकार राऊतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामुळे या जोडीची नव्याने चर्चा सुरु झाली.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले कलाकार म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर (Priyadarshani indalkar) आणि ओंकार राऊत (onkar raut). उत्तम विनोदकौशल्यामुळे चर्चेत येणारी ही जोडी मध्यंतरी त्यांच्या एका फोटोमुळे चर्चेत आली होती. त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. हा फोटो पाहिल्यावर ही जोडी एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जाऊ लागलं होतं. त्यानंतर आता प्रियदर्शनीने पुन्हा एकदा ओंकार राऊतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामुळे या जोडीची नव्याने चर्चा सुरु झाली.

प्रियदर्शिनी सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिच्या प्रोफेशनल लाइफविषयीचे अपडेट्स चाहत्यांना देत असते. यात काही वेळा ती तिच्या सहकलाकारांविषयीच्याही पोस्ट करते. यात नुकताच तिने ओंकारचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल झाला असून अनेक जण त्याच्यावर कमेंट करत आहेत. मात्र, ओंकारने केलेली कमेंट लक्ष वेधून घेत आहे.

प्रियदर्शनीने ओंकारचे काही व्हिडीओ कोलाज करुन त्याचा एक व्हिडीओ तयार केला आहे. या प्रत्येक व्हिडीओमध्ये ओंकार झोपलेला दिसतो. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा ओंकार झोपतो. मग कोणतंही ठिकाण असो तो सेट, गाडी तो लगेच झोपतो. असं या व्हिडीओमधून दिसतंय. हा व्हिडीओ पोस्ट करत प्रियदर्शनीने 'जागतिक आळसदिनाच्या शुभेच्छा ! Happy birthday @onkar_raut, PS - Please don’t kill me, असं कॅप्शन दिलं आहे.  सोबतच व्हि़डीओच्या बॅकग्राऊंडला बिग बॉसचा टाइम अलार्म वाजताना ऐकू येत आहे.

प्रियदर्शनीने हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर त्यावर ओंकारने कमेंट केली आहे. "याची जर कॉन्ट्रोव्हर्सी झाली तर मला सांगू नकोस," अशी कमेंट ओंकारने केली आहे. त्याच्या या कमेंटवर अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी