Join us

"मुंबईच्या पावसातला तो प्रसंग कधीच नाही विसरू शकणार", दक्षता जोईलने सांगितला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 19:49 IST

पाऊस हा प्रत्येक व्यक्तीसाठी एक वेगळा अनुभव देतो कोणासाठी तो गोड आठवणींचा साठा देऊन जातो तर कोणाला तो काही भयानक अनुभव देतो. अशाच काहीशा पावसाळ्यातल्या आठवणी सारं काही तिच्यासाठी मालिकेत निशीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दक्षता जोईल(Dakshata Joil)ने सांगितल्या.

पाऊस हा प्रत्येक व्यक्तीसाठी एक वेगळा अनुभव देतो कोणासाठी तो गोड आठवणींचा साठा देऊन जातो तर कोणाला तो काही भयानक अनुभव देतो. अशाच काहीशा पावसाळ्यातल्या आठवणी सारं काही तिच्यासाठी मालिकेत निशीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दक्षता जोईल(Dakshata Joil)ने सांगितल्या.  

दक्षता म्हणाली की, "पावसाळा मला प्रचंड आवडतो असं नाही, मला हिवाळा आवडतो. पावसाळा का नाही आवडत ह्याच मुख्य कारण मुंबईचा पाऊस, म्हणजे एकतर चिखल त्यात कामानिम्मित कुठे बाहेर जायचं असेल तर रस्ते तुंबलेले, वाहतूक विस्कळीत झालेली असते. पण मला कोकणातला पाऊस फार आवडतो. माझं गाव आहे तिथे, पावसात मस्त लाल मातीचे रस्ते, तो मातीचा सुगंध, हिरवीगार झाडं. खळ्यात छान बसलोय आणि समोर पाऊस पडतोय, हा नुसता संवादच मला आनंद देऊन जातो.

ती पुढे म्हणाली की, मुंबईच्या पावसातला एक भयानक किस्सा सांगायचं झाला तर मी ११ वीत होते तेव्हा घरी जात असताना प्रचंड पाऊस वाढला मी पार्ल्यातून प्रवास करत होते. मी लोकांच्या पाऊलावर पाऊल ठेवून तो रस्ता पार करायची कसरत सुरु केली. माझं कॉलेज सुरु होऊन एक आठवडाच झाला होता मला कळत नव्हतं की काय करू कसा तो तुंबलेले रस्ता पार करू, पाण्याचा प्रवाह लाटांसारखा येत होता. मी एका ताई सोबत थांबले कारण नाले उघडे होते आणि मला खूप भीती वाटत होती.  मी कशीतरी माझ्या बाबांपर्यंत पोहोचले जे तिथे एका कामानिम्मित आले होते आणि आम्ही रात्री २ वाजता कसेतरी घरी पोहचलो. 

पावसात मला टपरीवरच्या काचेच्या ग्लासातली कटिंग आणि गरमागरम बटाटा भजी आणि हिरवी चटणी खायला खूप आवडते. 'सारं काही तिच्यासाठी'चा सेट ज्या ठिकाणी आहे तिथे ही पावसाळ्यात सर्वत्र हिरवंगार होऊन जाते. भले शूटिंगमुळे तितका वेळ नाही मिळत पण छान फोटो काढून मी ती मोमेन्ट एन्जॉय करते, असे दक्षताने सांगितले.