Join us
Daily Top 2Weekly Top 5

'पुढच्या जन्मी तुझा फॅन होऊन भेटेन', चाहतीच्या निधनाचे वृत्त ऐकून नितीश चव्हाणच्या पायाखालची सरकली जमीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 16:24 IST

अभिनेता नितीश चव्हाणने सोशल मीडियावर खंत व्यक्त केली आहे.

कलाकार म्हटलं की त्यांचे चाहते आले. भलेही हे दोघं एकमेकांना भेटले नसले तरी त्यांच्यातील नाते काही औरच असते. असेच काहीसे पहायला मिळाले लागिर झालं जी मालिकेतील अज्या उर्फ अभिनेता नितीश चव्हाण आणि त्याची चाहतीमध्ये. तुम्हाला नितीशच्या चाहतीबद्दल समजल्यावर तुम्हीही भावूक व्हाल. नितीश चव्हाणच्या एका चाहतीची त्याला भेटण्याची शेवटची इच्छा होती आणि तिची ही इच्छा नितीश पूर्ण करू शकला नाही. त्याने ही खंत सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

नितीश चव्हाणने इंस्टाग्रामवर चाहतीसोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, तुझ्याबद्दल बातमी कळाली खूप वाईट वाटले. मला माहिती नव्हते तुझ्या हृदयामध्ये छिद्र होते आणि तुझी शेवटची इच्छा मला भेटण्याची होती, हे तर ऐकून पायाखालची जमीनच सरकली. 

पुढे नितीश म्हणाला की, तुझ्याबद्दल बऱ्याच जणांकडून ऐकले होते,पण तू मला भेटण्यासाठी काय काय केलेस हे आत्ताच समजले, ऐकून धक्काच बसला, वाटले नव्हते कोणी आपल्याला भेटण्यासाठी एवढे काय काय करेल, खरेच तू ग्रेट आहेस, सलाम आहे तुला. तुझ्यासारखी फॅन होणे अशक्य आहे. माफ कर मला कामामुळे मी तुला भेटू शकलो नाही पण एवढं नक्की सांगेन या जन्मी नाही भेटता आलं पण पुढच्या जन्मी मी तुझा फॅन होऊन नक्की भेटेन तुला. मला एवढं प्रेम दिलेस त्याबद्दल खूप खूप आभारी आहे तुझा. देव तुझ्या आत्म्यास शांती देवो.

नितीशच्या या चाहतीचे नाव गिरिजा होते. गिरीजाची शेवटची इच्छा नितीश त्याच्या कामामुळे पूर्ण करू शकला नाही. नितीशच्या या पोस्टवर त्याचे चाहते तिच्या आत्म्यास शांती लाभो म्हणून श्रद्धांजली वाहत आहेत. 

टॅग्स :नितीश चव्हाण