होणार सून मी या घरची फेम रोहन गुजरचा झाला साखरपुडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2017 14:21 IST
होणार सून मी या घरची ही मालिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. या मालिकेतील सगळ्या व्यक्तिरेखा प्रचंड प्रसिद्ध झाल्या होत्या. ...
होणार सून मी या घरची फेम रोहन गुजरचा झाला साखरपुडा
होणार सून मी या घरची ही मालिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. या मालिकेतील सगळ्या व्यक्तिरेखा प्रचंड प्रसिद्ध झाल्या होत्या. या मालिकेतील जान्हवी, श्री या मुख्य व्यक्तिरेखांसोबतच पिंट्या, ताई मावशी या सगळ्याच व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्या होत्या. रोहन गुजरने या मालिकेत साकारलेल्या पिंट्या या भूमिकेमुळे तो प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. ही मालिका संपून अनेक महिने झाली असली तरी प्रेक्षक आजही त्याला याच नावाने ओळखतात. तो नुकताच बन मस्का या मालिकेत झळकला होता. या मालिकेतील त्याच्या भूमिकेला देखील प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. तसेच तो सध्या वर खाली दोन पाय या नाटकात काम करत आहे. त्याच्या या नाटकाची चांगलीच चर्चा आहे. गेल्या काही वर्षांत रोहनने छोट्या पडद्यावर त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे.रोहन त्याच्या व्यवसायिक आयुष्यासोबतच सध्या वैयक्तिक आयुष्यातही खूप खूश आहे. रोहनचा नुकताच साखरपुडा झाला आहे. रोहनने त्याची मैत्रीण स्नेहल देशमुखसोबत नुकताच साखरपुडा केला. रोहन आणि स्नेहल गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे चांगले फ्रेंड्स आहेत. गेल्या 14 वर्षापासून ते एकमेकांचे फ्रेंड्स असल्याचे रोहननेच म्हटले आहे. त्याने त्याच्या जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थित साखरपुडा केला. रोहनने फेसबुकला त्याच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट करून त्याच्या साखरपुड्याची बातमी त्याच्या फॅन्सना दिली आहे. त्याने साखरपुड्याच्या समारंभातील अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत आणि त्याचसोबत 14 वर्षांची मैत्री... आणि आता डायल टोन... इन्गेंज्ड असे लिहिले आहे.