‘भूमिकेतून आयुष्य जगणं आवडतं’ - शिवांगी जोशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2018 18:49 IST
अबोली कुलकर्णी गोड चेहरा आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व म्हणून एक नवा चेहरा अभिनेत्री शिवांगी जोशी हिच्या निमित्ताने टीव्ही इंडस्ट्रीला मिळाला ...
‘भूमिकेतून आयुष्य जगणं आवडतं’ - शिवांगी जोशी
अबोली कुलकर्णी गोड चेहरा आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व म्हणून एक नवा चेहरा अभिनेत्री शिवांगी जोशी हिच्या निमित्ताने टीव्ही इंडस्ट्रीला मिळाला आहे. ‘यह रिश्ता क्या कहलाता हैं’ या स्टार प्लस वाहिनीवरील मालिकेतील तिची नायरा ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड पसंतीस उतरत आहे. शिवांगी जोशी आणि मोहसीन खान ही हॉट जोडी नव्या पिढीच्या ‘दिल की धडकन’ बनली आहे. तिच्या मालिकेतील आणि आत्तापर्यंतच्या प्रवासाविषयी तिच्याशी मारलेल्या या गप्पा...* ‘यह रिश्ता क्या कहलाता हैं’ मध्ये तू नायराच्या भूमिकेत दिसत आहेस. काय सांगशील नायराबद्दल?- प्रत्येक घरातील सामान्य मुलीप्रमाणे नायरा आहे. मस्तीखोर, चुलबुली अशी नायरा आहे. तिच्या मनात कुणाबद्दलही कोणतीच वाईट अपेक्षा नसते. खूपच चांगली आणि प्रामाणिक मुलगी आहे. तिचं तिच्या कुटुंबावर, पतीवर खुप प्रेम असते. त्यांच्यासाठी ती काहीही करू शकते. तिची भूमिका मी एन्जॉय करते. * शिवांगी आणि नायरा यांच्यात काय साम्य आहे?- शिवांगी आणि नायरा या दोघीही त्यांच्या कुटुंबियांवर विशेष प्रेम करतात. मोठ्यांचा आदर करतात. कोणतीही चुकीची गोष्ट घडत असेल तर त्याला साथ देत नाहीत. त्याच्याविरोधात आवाज उठवतात. नायराची व्यक्तिरेखा साकारताना मला फार काही अवघड गेलं नाही कारण ती पूर्ण माझ्यासारखीच आहे. * मोहसीन खानसोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे?- मोहसीन खान माझा खूपच चांगला को-स्टार आहे. आम्ही एकमेकांसोबत खूप कम्फर्टेबल असतो. शूटिंग करत असताना तो खूप आनंदी असतो. आमच्यात खूप चांगलं बाँण्डिंग निर्माण झालं आहे. * मालिकेत सध्या सुरू असलेल्या कथानकाबद्दल काय सांगशील?- कार्तिक आणि नायरा यांना रात्रीच्या वेळेस एक बाळ सापडते. अंधार असल्याने ते बाळाच्या पालकांबद्दल फार काही चौकशी करू शकत नाहीत. मात्र, ते जेव्हा त्या बाळाला घरी घेऊन येतात. तेव्हापासून त्याच्यासोबत राहून राहून त्यांनाही त्या बाळाचा लळा लागतो. अशातच कार्तिकने दादीला सांगितलेले असते की, त्यांना बाळ नको आहे. मात्र, या बाळाच्या येण्याने त्यांनाही आता बाळ असावे असे वाटू लागले आहे. * तुझी आत्तापर्यंतची बेस्ट कॉम्प्लिमेंट कोणती? - माझ्या घरचे जेव्हा नायराला पाहतात तेव्हा ते म्हणतात की ही तर आमची शिवांगीच आहे. तसेच माझ्या ओळखीचे किंवा माझे चाहते म्हणतात की, आम्हाला नायरासारखीच मुलगी, सून पाहिजे. तेव्हा कुठेतरी असे वाटते की, होय, आपण एक चांगली व्यक्तिरेखा साकारतो आहे. आपण चांगले काम करतो आहोत. मला असं वाटतं हीच माझ्यासाठी बेस्ट कॉम्प्लिमेंट आहे. * तुझ्या आगामी प्रोजेक्टविषयी काय सांगशील?- सध्या तरी मी ‘यह रिश्ता क्या कहलाता हैं’ या मालिकेवर आणि माझ्या नायरा या भूमिकेवर लक्षकेंद्रित केले आहे. सध्या तरी कुठला दुसऱ्या प्रोजेक्टवर काम करण्याचा विचार नाही.