Join us

मला इतक्यातच नवी नाती जोडायची नाहीत- स्नेहा वाघ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2017 14:10 IST

‘शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’ या भव्य ऐतिहासिक मालिकेत राज कौरची भूमिका साकारताना आपल्या अभिनयाने स्नेहा वाघने प्रेक्षकांच्या मनात ...

‘शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’ या भव्य ऐतिहासिक मालिकेत राज कौरची भूमिका साकारताना आपल्या अभिनयाने स्नेहा वाघने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. आपल्या वैयक्तिक जीवनात काही गंभीर उतार-चढाव सोसल्याने मनाने कणखर बनलेली अभिनेत्री स्नेहा वाघ सध्या मात्र अतिशय आनंदात आयुष्य जगतेय. प्रत्येकाला जोडीदाराची गरज लागते किंवा आपले सुख दु:ख समजून घेण्यासाठी कोणीतरी समजून घेणारे आपले हक्काचे कोणीतरी असावे या प्रश्नावर स्नेहा म्हणाली,“हे खरंय की आपले सगळ्या गोष्टीं शेअर करण्यासाठी कोणीतरी असाव असे असलं तरी मी यांवर जास्त विश्वास ठेवत नाही.मी एकटी नसून माझ्यावर प्रेम करणारे माझे कुटूंब आहे, मित्र मैत्रिणी आहेत इतके प्रेम करणारी माणसे जवळ असल्यावर आणखी कशाला नाती जोडायची. मी आता पूर्वीपेक्षा मनाने खंबीर झाले आहे.त्यामुळे कोणी मला कमी लेखू पाहील, तर मी ते अजिबात सहन करत नाही.”आता काही नवी नाती जोडण्याची तुझी तयारी आहे का, असे विचारल्यावर स्नेहाने सांगितले, “नाही. मला इतक्यातच नवी नाती निर्माण करायची नाहीत किंवा सध्या मला लग्नही करायचं नाही. मी केवळ स्वत:वरच लक्ष केंद्रित करणार आहे. हो, मी पूर्वी काही चुका केल्या होत्या आणि माझे काही निर्णयही चुकीचे होते; माझ्या त्या निर्णयांवर पश्चातापही होत नाही. कारण ते निर्णय मीच घेतले होते. सध्या तरी मला कोणतीही नवी नाती निर्माण करण्यात रस नाही. मला माझे कुटुंबीय आणि मित्रपरिवार प्रिय आहे. आता माझं प्रेम हे एकाएकी कोणा नवख्या व्यक्तीवर उधळून टाकण्याची मला इच्छा नाही. नव्या नात्यांबरोबर भावनांचा छळ होतो. त्यामुळे भावनांवर मला माझा वेळ खर्च करण्याची इच्छा नाही.सध्या माझं माझ्या कामावरच प्रेम आहे.”