बडे अच्छे लगते है फेम पिहू परतली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2017 15:45 IST
बडे अच्छे लगते है ही मालिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. या कार्यक्रमातील साक्षी तन्वर आणि राम कपूर यांची ...
बडे अच्छे लगते है फेम पिहू परतली
बडे अच्छे लगते है ही मालिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. या कार्यक्रमातील साक्षी तन्वर आणि राम कपूर यांची जोडी, या मालिकेची कथा सर्व काही प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. या कार्यक्रमातील साक्षी आणि रामच्या केमिस्ट्रीची तर चांगलीच चर्चा झाली होती. पण या दोघांसोबतच या कार्यक्रमातील आणखी एक व्यक्तिरेखा प्रचंड गाजली होती. या मालिकेतील छोटी पिहू आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेत पिहूची भूमिका अमृता मुखर्जीने साकारली होती. अमृताने तिच्या गोड हास्याने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. पण या मालिकेनंतर अमृता कोणत्याच मालिकेत झळकली नाही. पण आता ती एका मालिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे.लाइफ ओके या वाहिनीवर मासूम ही मालिका लवकरच सुरू होत आहे. या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत अमृता दिसणार आहे. अमृता जवळजवळ तीन वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतणार आहे. मासूम या मालिकेसाठी या मालिकेचे निर्माते अतिशय बबली मुलीच्या शोधात होते. त्यावेळी पिहूच त्यांच्या सगळ्यात पहिल्यादा डोळ्यांसमोर आली. अमृता या भूमिकेसाठी योग्य आहे आणि तीच या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकते असे निर्मात्यांचे म्हणणे असल्याने त्यांनी या मालिकेसाठी अमृताला विचारले आणि तिनेदेखील या भूमिकेसाठी होकार दिला असल्याचे म्हटले जात आहे. मासूम या मालिकेतील नायक अथवा नायिकेच्या बहिणीच्या भूमिकेत आपल्याला अमृताला पाहायला मिळणार आहे. या मालिकेसाठी अनेक प्रसिद्ध कलाकारांचा विचार केला जात असल्याचे म्हटले जात आहे.