Join us
Daily Top 2Weekly Top 5

अशा गेटअपमध्ये स्वत:लाच ओळखणं अभिनेत्याला झालं कठिण,तुम्ही तरी ओळखले का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 12:17 IST

Rishton Ka Manjha मालिकेच्या आगामी भागांमध्ये कथानकाला मिळणाऱ्या नव्या कलाटणीमुळे प्रेक्षक थक्क होतील. दियावर नजर ठेवण्यासाठी बॅडमिंटन कोर्टवर अर्जुन एका वयस्क झाडूवाल्याचे सोंग कसे घेतो, ते या आगामी भागांमध्ये पाहायला मिळेल.

छोट्या पडद्यावरील ‘रिश्तों का मांझा’ या मालिकेने सुरुवातीपासूनच रसिकांना खिळवून ठेवले आहे. मालिकेतल्या अनपेक्षित कलाटण्यांनी प्रेक्षकांची मालिकेतील उत्कंठा कायम राहिली आहे. साहजिकच कृशाल आणि आंचल यांनीही आपल्या व्यक्तिरेखा वास्तववादी साकारल्या जातील, यासाठी प्रयत्नांमध्ये कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही. कृशाल आहुजाने आपली अर्जुनची व्यक्तिरेखा अतिशय बारकाईने उभी केली आहे. या भूमिकेसाठी खूप मेहनतही घेतली आहे. अलीकडेच प्रेक्षकांनी पाहिले की करण माथूरच्या तावडीतून दियाला वाचविण्यासाठी अर्जुन एका झाडूवाल्याचं सोंग कसं घेतो ते. 

आता रिश्तों का मांझा मालिकेच्या आगामी भागांमध्ये कथानकाला मिळणाऱ्या नव्या कलाटणीमुळे प्रेक्षक थक्क होतील. दियावर नजर ठेवण्यासाठी बॅडमिंटन कोर्टवर अर्जुन एका वयस्क झाडूवाल्याचे सोंग कसे घेतो, ते या आगामी भागांमध्ये पाहायला मिळेल. या झाडूवाल्याचे रूप घेण्यासाठी कृशालने आपल्या लूकमध्ये आमूलाग्र बदल केला असून वयस्क व्यक्तीचा चेहरा निर्माण करण्यासाठी त्याने 14 तास केसांचा टोप घातला होता आणि चेहऱ्यावर गोंदाने मेक-अप चिकटवला होता.

या नव्या रूपाबद्दल कृशाल आहुजा म्हणाला, “या भूमिकेसाठी मेक-अप करणं खूप कठीण होतं. माझ्या मेक-अप कलाकाराने उत्तम कामगिरी केली असून किंबहुना माझा मेक-अप झाल्यावर मी स्वत:चाच चेहरा ओळखू शकलो नव्हतं. मला या भूमिकेसाठी केसांचा टोप घालायला दिला होता. तो मला सतत 14 तास डोक्यावर घालावा लागला आणि इतका काळ तो टोप घालून वावरणं ही कठीण गोष्ट होती. माझ्या मेक-अप आर्टीस्टने माझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या कशा निर्माण केल्या ते पाहून मी चकित झालो आणि चेहऱ्यावरील मेक-अपचा थर पातळ करण्यासाठी त्याने चिकटपट्टीचा वापर केला. तसंच ही गोष्ट सर्वांना ठाऊक नसेल, पण सध्याच्या थंडीच्या दिवसात हा गोंद चेहऱ्यावर फार काळ टिकत नाही कारण थंडीमुळे आपली त्वचा कोरडी पडते. 

तसंच यामुळे बोलतानाही थोडा त्रास होतो. तरीही एकंदरीत हा एक छान अनुभव होता कारण बऱ्याच काळानंतर मला अर्जुनखेरीज दुसरी व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली.”झाडूवाल्याची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्यामुळे कृशाल आहुजा आनंदी असला, तरी बॅडमिंटनच्या कॅम्पमध्ये आपल्यासमोर कोणतं आव्हान उभे राहणार आहे, याची अर्जुन आणि दियाला कल्पना नाही. अर्जुनने बॅडमिंटन खेळणे का सोडले, त्याचे कारणही प्रेक्षकांना या भागांमध्ये कळून येईल का? हे पाहणे नक्कीच रंजक असणार आहे.