Join us  

Tu Tevha Tashi : "मी या दोघींपासून....", ‘तू तेव्हा तशी’च्या अनामिकाची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 4:51 PM

Tu Tevha Tashi : मालिकेतील अनामिका म्हणजेच अभिनेत्री शिल्पा तुळसकरनं वल्ली आणि राधासाठी खास पोस्ट लिहिली आहे...

झी मराठी वाहिनीवरील स्वप्नील जोशी व शिल्पा तुळसकर यांची ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi ) ही मालिका आली तशी अल्पावधीत लोकप्रिय झाली. सौरभच्या भूमिकेत असलेला स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) आणि अनामिकाच्या भूमिकेत असलेल्या शिल्पा तुळसकरची (Shilpa Tulaskar) रोमॅन्टिक केमिस्ट्रीही चाहत्यांना आवडली. चाळीशी पार केलेल्या सौरभ आणि अनामिकाच्या या फ्रेश व युथफूल प्रेमकहाणीने सर्वांनाच वेड लावलं. पण आता निरोपाची वेळ जवळ आलीये. होय, ही मालिका कायमचा निरोप घेतेय.

गेल्या अनेक दिवसांपासून ही मालिका  प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता मालिका निरोप घेणार असल्याचं कन्फर्म झालं आहे. मालिकेतील अनामिका म्हणजेच अभिनेत्री शिल्पा तुळसकरनं मालिकेच्या शेवटच्या शुटींगचा फोटो शेअर करत वल्ली आणि राधासाठी म्हणजे अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि रूमानी खरे यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. "मी या दोघींपासून कशी दूर राहू?", असं तिने म्हटलं आहे. तिघींच्या एक गोड फोटोही तिने शेअर केला आहे. 

या मालिकेत पट्या आणि अनुची अनोखी लव्हस्टोरी दाखवली आहे. पहिल्या लग्नातून विभक्त झालेली अनामिका आणि आपल्या प्रेमाचा वाट पाहणारा पट्या यांच्या प्रेमकहाणीत अनेक विघ्न आली. पण शेवटी प्रेमाचा विजय झाला. मालिका आधी रात्री 8 वाजता प्राइम टाइला टेलिकास्ट होत होती. पण मालिकेची वेळ बदलण्यात आली. मालिकेत स्वप्निल जोशी, शिल्पा तुळसकर, सुहास जोशी, अभिज्ञा भावे, रूमानी खरे, स्वानंद केतकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसले.  

टॅग्स :अभिज्ञा भावेस्वप्निल जोशीझी मराठीटेलिव्हिजन