Join us
Daily Top 2Weekly Top 5

'नागार्जुन एक योध्दा'ने गाठला 100 भागांचा पल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 10:37 IST

काही महिन्यांपूर्वी रसिकांच्या भेटीला आलेली ‘नागार्जुन एक योध्दा’ या मालिकेने नुकतेच 100 एपिसोड पूर्ण केले. मालिकेच्या सेटवर केक कापून ...

काही महिन्यांपूर्वी रसिकांच्या भेटीला आलेली ‘नागार्जुन एक योध्दा’ या मालिकेने नुकतेच 100 एपिसोड पूर्ण केले. मालिकेच्या सेटवर केक कापून दणक्यात सेलिब्रेशन करण्यात आले.छोट्या पडद्यावरील नागार्जुन या मालिकेनं अल्पावधीत आपल्या वेगळ्या कथानकामुळं रसिकांच्या मनात वेगळं स्थान मिळवलं. त्यामुळे ही मालिका रसिकांची मनं जिकण्यातही यशस्वी ठरली. आता 100 भागांचा टप्पा गाठल्यानंतर 1000 भागापर्यंत पोहोचण्याची इच्छा कलाकारांनी व्यक्त केलीय. मालिकेत निकेतन धीर, पूजा बॅनर्जी, चेतन हंसराज, मनीष वाधवा, किशोरी शहाणे आणि श्रुती उल्फत कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.ही मालिका सुरूवातीपासूनच विविध कारणांमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेत राहिली आहे, मग ते मालिकेसाठी उभारलेले भव्य सेट असोत की मालिका साकारण्यासाठी एकत्र आलेले नामवंत कलाकार. अलीकडेच मालिकेच्या नयकाची भूमिका साकारणारा अभिनेता अंशुमन मल्होत्राच्या जागी पर्ल व्ही. पुरीची निवड करण्यात आल्यामुळे ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली होती. आता मालिकेने आपल्या भागांचे शतक पूर्ण केल्यामुळे मालिकेतील कलाकारामध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण होते. मालिकेच्या 100 भागांचा टप्पा साजरा करण्यासाठी पर्ल व्ही. पुरी, निकितीन धीर, मृणाल जैन, पूजा बॅनर्जी तसेच अंशुमन मल्होत्रा याच्यासह मालिकेतील सर्व प्रमुख कलाकार सेटवर उपस्थित होते.