मानव खिडकीमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 13:04 IST
खिडकी या नव्या मालिकेत प्रेक्षकांना एकाच मालिकेत अनेक कथा पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत सरिता जोशी, राजीव मेहता, लुब्ना ...
मानव खिडकीमध्ये
खिडकी या नव्या मालिकेत प्रेक्षकांना एकाच मालिकेत अनेक कथा पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत सरिता जोशी, राजीव मेहता, लुब्ना सलीम, ऐश्वर्या सखुजा यांसारखे कलाकार वेगवेगळ्या कथेनुसार वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारणार आहेत. यांच्याशिवाय कथेच्या गरजेनुसार प्रत्येक भागांमध्ये आखणी काही कलाकारही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या मालिकेतील टिफिन चोर या कथेत अभिनेता मानव गोहिल झळकणार आहे. मानवने काही महिन्यांपूर्वी यम है हम ही मालिका केली होती. ही मालिका प्रचंड गाजली होती. ही मालिका संपल्यानंतर कित्येक महिन्यांनंतर खिडकी या मालिकेद्वारे तो छोट्या पडद्यावर झळकणार आहे.