Join us  

​तेनाली रामा या मालिकेत मानव गोहिल दिसणार एका वेगळ्या रूपात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2017 7:10 AM

तेनाली रामा ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेचे चांगलेच कौतुक केले जात आहे. या मालिकेतील तेनाली रामा, कृष्णदेवराय यांसारख्या ...

तेनाली रामा ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेचे चांगलेच कौतुक केले जात आहे. या मालिकेतील तेनाली रामा, कृष्णदेवराय यांसारख्या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेत मानव गोहिल, कृष्णा भारद्वाज, प्रियंवदा कांत, निमिषा वखारिया या कलाकारांच्या मुख्य भूमिका असून त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेला आता नवे वळण येणार असून या मालिकेत मानव गोहिल एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तेनाली रामा या मालिकेत कृष्णदेवराय हा राजा असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. आता या राजासारखा हुबेहूब दिसणारा एक व्यक्ती त्यांच्या राज्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर मीच राज्याचा राजा आहे असे तो सगळ्यांना सांगणार आहे. त्यामुळे तथाचार्य म्हणजेच पंकज बेरी आणि रामा यांना यातील खरा राजा कोण असा प्रश्न पडणार आहे. खरा राजा आणि खोटा राजा यांच्यात शाब्दिक बाचाबाची देखील होणार आहे. त्यामुळे खरा राजा कोण ही ओळखण्याची जबाबदारी तेनालीवर येणार आहे आणि तो त्याची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडणार आहे. तो दोन्ही राजांना काही प्रश्न विचारणार आहे आणि त्यातून खरा राजा कोण आहे हे सगळ्यांना सांगणार आहे. तेनाली रामा या मालिकेचे पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार असल्याचे म्हटले जात आहे. मानवचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. मानव गोहिलने आजवर कहानी घर घर की, कुसूम, कसौटी जिंदगी की, सारा आकाश, बडे दूर से आये है, नागिन, अगले जन्म मोहे बिटियाँ ही किजो यांसारख्या मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तेनाली रामा या मालिकेआधी मानव यम है हम या मालिकेत झळकला होता. या मालिकेत त्याने साकारलेल्या यमराज या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेत अतुल परचुरेने चित्रगुप्तची व्यक्तिरेखा साकारली होती. या मालिकेत मानव आणि अतुलची खूप चांगली केमिस्ट्री जमून आली होती. Also Read : तेनालीरामा मालिकेतील पंकज बेरी सांगतायेत, प्रेक्षकांना माझा खलनायकी अंदाजच अधिक आवडतो