Join us

Promo : हृदयी प्रीत जागते...! सुरू होतेय आणखी एक नवी मालिका, ‘तू तेव्हा तशी’ घेणार निरोप!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 10:55 IST

 Zee Marathi New Serial Promo : होय, प्रेक्षकांच्या भेटीला आणखी एक नवी मालिका येतेय. झी मराठीवर नुकतीच ‘दार उघड बये’ ही मालिका सुरू झाली. आता आणखी एका नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे.

 Zee Marathi New Serial : झी मराठीच्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, प्रेक्षकांच्या भेटीला आणखी एक नवी मालिका येतेय. झी मराठीवर नुकतीच ‘दार उघड बये’ ही मालिका सुरू झाली. आता आणखी एका नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे. आता नवी मालिका येणार म्हटल्यावर, जुनी एखादी मालिका निरोप घेणार हे नक्की. तेव्हा कोणती मालिका निरोप घेणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असले. तर त्याचीही चर्चा सुरू झाली आहे.चर्चा खरी मानाल तर, शिल्पा तुळसकर आणि स्वप्नील जोशीची ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेऊ शकते. अर्थात याबद्दल अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही. पण नव्या मालिकेचा प्रोमो आल्यानंतर अनामिका आणि सौरभच्या राहून गेलेल्या प्रेमाची गोष्ट संपणार, असं मानलं जात आहे.

नव्या मालिकेचा प्रोमो पाहून चाहते क्रेझीनव्या मालिकेचं नाव ‘हृदयी प्रीत जागते’ (Hridayi Preet Jagate ) असं आहे.  या नव्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक के्रझी झाले आहेत. एक रिदमचा बादशाहा आणि एक सुरांची राणी अशी दोघांची जुगलबंदी मालिकेत पाहायला मिळणार आहे. मालिकेचा प्रोमो बघता ही मालिका म्युझिकल बेस असणार आहे, असा कयास आहे. मालिकेचं टायटल साँगही प्रदर्शित झालं आहे.  ‘हृदयी प्रीत जागते’ ही मालिका येत्या 7 नोव्हेंबरपासून सोमवार ते शनिवारी रात्री 8 वाजता सुरू होणार आहे. त्याचमुळे 8 वाजता सुरू असणारी ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे, अशी चर्चा ऐकायला मिळतेय.  

 कोण आहेत कलाकार‘हृदयी प्रीत जागते’ या मालिकेत अभिनेता सिद्धार्थ खिरिड प्रमुख भूमिकेत आहे. सिद्धार्थ याआधी ‘फ्रेशर्स’ सारख्या मालिकेत दिसला होता.  सध्या तो ‘मुलगी झाली हो; या मालिकेत सिद्धार्थ भोसलेची भूमिका साकारत होतो. सप्टेंबर महिन्यातच सिद्धार्थनं ही मालिका सोडली. मालिकेत एक नवा चेहराही पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री पूजा कातुर्डे या मालिकेत नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.  

टॅग्स :झी मराठीटेलिव्हिजनमराठी अभिनेतासेलिब्रिटी