पारू (Paru Serial ) आणि सावळ्याची जणू सावली (Savlyanchi Janu Savali) महासंगम भागात पुन्हा सावली-सारंग आणि आदित्य-पारू आपल्या कुटुंबाला एका मोठ्या संकटातून बाहेर काढणार आहेत. काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की अहिल्याकडे आयटीची धाड पडते पण तेव्हा त्या व्यक्तीचा अपमान करून त्याला बाहेर काढलं जातं. आता त्याच व्यक्तीची मुलगी एक मोठी कंपनी चालवतेय आणि तिच्या कंपनीमध्ये काही कामाकरिता सोहम जातो. सोहमचं वागणं बघून ती त्याच्या प्रेमात पडते.
दुसरीकडे सोहम सावलीला सांगतो त्याचं तारावर प्रेम आहे. एका मोठ्या बर्थडे पार्टीला सोहमच्या घरच्यांना इन्व्हाईट केलं जातं. अहिल्याला ही याच इन्व्हाईट आलंय, ही व्यक्ती इतर कोणी नसून तीच व्यक्ती आहे ज्याचा अपमान अहिल्याकडून झालाय. ती व्यक्ती सांगते कि मोठी फॅक्टरी सुरु करून या गावी रोजगार देण्याचा त्याचा मानस आहे. पण या रोजगाराच्या कॉन्ट्रॅक्ट मधून त्या दोघांचं भांडण होणार आहे. बर्थडे पार्टी मध्ये एक मोठी गोष्ट घडते. सोहम आणि त्या मुलीचं म्हणजेच कियाराचं लग्न फिक्स केलं जात. सगळे मुंबईत असल्यामुळे सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होतो. विश्वंभरला अहिल्याचा बदला घ्यायचाय आणि म्हणून इथून गेम प्लान सुरु होतो.
आता विश्वंभर ठाकूर नावाच्या वादळाला कशा सामोऱ्या जातील पारू आणि सावली? आदित्य आणि सारंग अहिल्या आणि तिलोत्तमाला कसे वाचवतील? हे लग्न थांबवण्यात पारू- सावली यशस्वी होतील? हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.