Join us

पहलगाम हल्ल्यानंतर अंकिता लोखंडेचा मोठा निर्णय, पोस्ट शेअर करत म्हणाली-"एक भारतीय म्हणून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 12:46 IST

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

Ankita Lokhande: पहलगाममध्ये २६ निष्पाप लोकांची हत्या झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. जगभरातून या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांसाठी संवेदना व्यक्त केल्या जात आहेत. या हल्ल्यासाठी जो जबाबदार असेल त्याला जगाच्या कोपऱ्यातून शोधून काढू असं सांगत भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याशिवाय पाकिस्तानविरोधात मोठमोठे निर्णय घेत सैन्यालाही कारवाईसाठी मुभा दिली आहे. तसेच दशहतवाद्यांच्या या क्रूर प्रवृत्तीला विरोध दर्शवत अनेक कलाकार महत्वाचे निर्णय घेताना दिसत आहेत. आमिर खानने त्याच्या सितारे जमीन पर सिनेमाचं ट्रेलर लॉन्चिंग पुढे ढकळलं. आता पहलगाम हल्ल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेने एक मोठा निर्णय घेतला आहे. याविषयी तिने  सोशल मीडियावर जाहीर केलंय. 

अंकिता लोखंडेने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत यूएसए दौरा रद्द केल्याचं सांगितलं आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की,"जड अंतःकरणाने, मी हे सांगू इच्छिते की मी माझा आगामी यूएसए शो रद्द करत आहे. पहलगाममधील दुःखद दहशतवादी हल्ल्यांमुळे आपला देश ज्या वेदनांमधून जात आहे त्या पार्श्वभूमीवर, मला वाटतं की ही या दौऱ्यासाठी योग्य वेळ नाही. माझ्या संवेदना आणि प्रार्थना पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. एक भारतीय म्हणून मी या दुःखात सहभागी आहे."

यानंतर पुढे अभिनेत्रीने लिहिलंय की, "आमचा हा दौरा कायमचा रद्द केलेला नाही. परिस्थिती योग्य वाटेल तेव्हा आम्ही तो नंतरच्या तारखेला पुन्हा शेड्यूल करू. लवकरच भेटू. तुमचं प्रेम आणि  आपुलकीबद्दल धन्यवाद...!" अशी पोस्ट शेअर करत अंकिताने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. 

टॅग्स :अंकिता लोखंडेपहलगाम दहशतवादी हल्लासेलिब्रिटी