Join us

हिना खान, स्नेहा उल्लाल नव्हे तर उतरण फेम टीना दत्ता झळकणार मीना बाजारमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 12:05 IST

निर्माती रश्मी शर्माने आजवर ससुराल सिमर का, शक्ती अस्तित्व के एहसास की यांसारख्या हिट मालिका छोट्या पडद्याला दिल्या आहेत. ...

निर्माती रश्मी शर्माने आजवर ससुराल सिमर का, शक्ती अस्तित्व के एहसास की यांसारख्या हिट मालिका छोट्या पडद्याला दिल्या आहेत. आता रश्मी एक वेगळी आणि हटके मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे. तवायफच्या आयुष्यावर एक मालिका लवकरच बनवण्यात येणार असून आजवरच्या मालिकांपेक्षा ही मालिका खूप वेगळी असणार आहे. ही मालिका स्त्रीकेंद्री असल्याने या मालिकेत एखाद्या चांगल्या नायिकेने काम करावे असे या मालिकेच्या टीमचे म्हणणे होते. या मालिकेतील भूमिकेसाठी हिना खानचा विचार देखील करण्यात आला असल्याचे म्हटले जात होते. पण हिना सध्या बिग बॉसमध्ये झळकत असल्याने ती या मालिकेचा भाग असणार नाहीये. तिच्यानंतर स्नेहा उल्लाल ही मालिका करणार अशी चर्चा होती. स्नेहाने सलमान खानच्या लकी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. पण स्नेहाला बॉलिवूडमध्ये यश मिळवता आले नाही. स्नेहा या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर एंट्री करणार असल्याचे म्हटले जात होते. पण स्नेहाला देखील ही मालिका मिळाली नसल्याची चर्चा आहे. उतरण या मालिकेत इच्छाची भूमिका साकारणाऱ्या टीन दत्ताने यात बाजी मारली असून ती लवकरच चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याचे म्हटले जात आहे.टीना दत्ता प्रेक्षकांना या मालिकेत एका तवायफच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत टीना एका बंगाली मुलीची भूमिका साकारणार असून या मालिकेचे नाव मीना बाजार असे असणार आहे. वेश्यांच्या घरी जन्मलेल्या एका मुलीची कथा या मालिकेत दाखवली जाणार आहे. या मालिकेचे चित्रीकरण कोलकता येथे होणार आहे आणि विशेष म्हणजे टीना ही मुळची कोलकताची आहे. त्यामुळे तिच्याच शहरात ती या मालिकेचे चित्रीकरण करणार आहे. या मालिकेचे अधिकाधिक चित्रीकरण कोलकाता येथे होणार असून त्यानंतर या मालिकेचा सेट मुंबईत उभारला जाणार आहे. ऋषी कपूर आणि रती अग्निहोत्री यांचा मीना बाजार हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटावर आधारित ही मालिका असणार असल्याचे म्हटले जात आहे. Also Read : ​‘या’ गंभीर आजाराने ग्रस्त होती सलमान खानची हिरोईन स्नेहा उल्लाल!